शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या'! पुण्यात मानांच्या गणपतींचं विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 3:51 PM

गणेश चतुर्थीला थाटात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देमानाच्या गणपतींचं दरवर्षीच्या क्रमवारीनुसार थाटात विसर्जन

पुणे :  गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत गणेश चतुर्थीला थाटात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. सकाळापासूनच पुण्यात गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात दरवर्षीच्या परंपरेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मानाचा पहिला श्री कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्ते, भक्तगण आणि नगारा वादन करत बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी ११.३० वाजता कसबा गणपतीचं विसर्जन झाले. 

तांबडी जोगेश्वरी

पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती समोर वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, विक्रम साराभाई, एम विश्वैश्वरैय्या अशा थोर पुरुषांच्या तसेच ऑलिंपिक व पॅरालिंपिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडू प्रति नीरज चोप्रा, अवनी लेखरा, सिन्घराज अधानी, भाविनाबेन पटेल, पी व्ही सिंधू यांच्या वेशभूषेतील कार्यकात्यांच्या उपस्थितित आणि "वंदे मातरम्" च्या जयघोषात सकाळी ११.३२ वाजता विसर्जन झाले. कोरोना संदर्भातील सर्व नियमावली पाळत हा विसर्जन सोहळा रंगला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी श्रीं ना पुष्पहार घातल्यावर श्रीं ची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मांडवासमोरच्या हौदात विसर्जन करण्यात आले. पोलीस सहआयुक्त श्री रविंद्र शिसवे हे सुद्धा उपस्थित होते.

गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाला महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात अन् गुलालाची उधळण करत मांडवाजवळील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे १२.३८ वाजता विसर्जन करण्यात आलं. यावेळी मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोरयाचा जयघोषात बाप्पाला निरोप दिला. 

तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचं विसर्जन

तुळशीबाग मंडळाच्या श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. विसर्जनासाठी आकर्षक गजकुंड तयार करण्यात आला होता. उत्सव मंडपात  १.१६ वाजता गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. 

तुळशीबाग गणपती मंडळाच्या ढोल ताशा पथकाला पोलिसांनी रोखलं

गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात मिरवणूक आणि वादनाला परवानगी नसतानाही मानाच्या चौथ्या गणपतीसमोर ढोल वादन करण्यात आलं. यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आणि कार्यकर्ते, वादक यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं. आले आले रे तुळशीबागवाले आले, मंगलमूर्ती मोरया च्या जयजयकार करत तुळशीबाग गणपतीचं वाजता विसर्जन करण्यात आलं. यावेळी मंडळाचे नितीन पंडित म्हणाले, आता पोलिसांनी ढोल ताब्यात घेतले होते. आम्ही रीतसर २ -  २ ढोल ताशांची परवानगी मागितली होती. त्यामुळं कारवाई होणार नाही. पोलिसांनी ढोल परत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.  

केसरी वाडा गणपतीचं विसर्जन

मानाच्या पाचव्या केसरी गणपतीचं वेळेआधीच विसर्जन करण्यात आलं. १:२० मिनीटांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत गणरायाला निरोप देण्यात आला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं विसर्जन 

हिंदुस्तानातील पहिला मानाचा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दुपारी २.३० वाजता मांडवाजवळील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं. श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यावर मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सव