शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

पुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:06 PM

कातरवेळी वातावरणाने पांघरलेली शीतलतेची दुलई, तितक्याच शीतलतेने मनात रुंजी घालणारे स्वर, सुरांमधून अवतरलेले वेणूपर्व असा मणिकांचन योग कानसेनांनी अनुभवला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची उणीव रसिकांना अस्वस्थ करून गेली. 

ठळक मुद्दे२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान गानसरस्वती महोत्सवाचे आयोजननाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर महोत्सव

पुणे : कातरवेळी वातावरणाने पांघरलेली शीतलतेची दुलई, तितक्याच शीतलतेने मनात रुंजी घालणारे स्वर, सुरांमधून अवतरलेले वेणूपर्व असा मणिकांचन योग कानसेनांनी अनुभवला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची उणीव रसिकांना अस्वस्थ करून गेली. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन केले आहे. जयपूर घराण्याच्या गायिका अपर्णा पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने गानसरस्वती महोत्सवास प्रारंभ झाला. त्यांनी ‘तेरे बिरहा’ या रचनेतून भीमपलास रागाचा विस्तार केला. डमरू डमडम बाजे, सुंदर अंगना बैठी या रचनांमधून रसिकांवर सुरांची बरसात झाली. त्यांना श्रीकांत भावे (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संपदा बेलवलकर (तानपुरा), आरती पटवर्धन (तानपुरा), माधवी घुमटकर (गायन) यांनी सुरेल साथसंगत केली. त्यांच्यानंतर बासरीवादक शशांक सुब्रह्मण्यम यांच्या कर्नाटक शैलीतील बासरीवादनातून वातावरणात सुरेल रंग भरले. त्यांनी हेमवती राग सादर केला. आलाप, जोड, झालाशी सुसंगत रागम, तानम सादरीकरणानंतर पल्लवीतून तीनतालातील दोन रचना सादर केल्या. त्यांना पं. योगेश समसी (तबला), पत्री सतीश कुमार (मृदंग), शुभम खंडाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ यांच्या स्वरमैफलीने समारोप झाला.  

...आता दुसरी किशोरी आमोणकर होणे नाही!पुणे : आई लोकानुरंजनासाठी कधीच गायली नाही. संगीत अध्यात्म, शांततेकडे नेणारे असते, असेच तिचे मत होते. सुगरणीच्या हातचे जेवल्यावर इतर कोणतेच पदार्थ रुचकर लागत नाहीत. त्याचप्रमाणे लहानपणापासून आईचे स्वर कानावर पडल्यामुळे बेसूर गाण्यांचा त्रास होतो. आईची संगीताप्रति श्रद्धा, गुरूवरचा विश्वास, रियाझ आणि साधना विलक्षण आहे. आता दुसरी किशोरी आमोणकर होणे नाही, अशा शब्दांत निहार आणि बिभास आमोणकर यांनी आईच्या आठवणी कथन करताना त्यांना गहिवरून आले होते. आईबद्दल लिहिण्याची ताकदही नाही, असे सांगत त्यांनी भावनांना वाट करून दिली. 

किशोरीतार्इंच्या नावाच्या मंचावर सादरीकरण करताना मनात भीती आहेच; मात्र, प्रेक्षक सांभाळून घेतील, हा विश्वासही वाटतो.- अपर्णा पणशीकर

किशोरीतार्इंकडून आयुष्यभर प्रेरणा मिळत राहिली. त्यांच्या सादरीकरणाच्या स्मृती जपलेल्या रंगमंचावर आज सादरीकरणाची संधी मिळत आहे. पुण्यातील रसिकांसमोर सादरीकरण करणे, हा कायम सन्मान असतो.- शशांक सुब्रमण्यम 

आपल्याकडे संगीतातील अनेक घराण्यांची परंपरा आहे. प्रत्येक जण आपापले कलश कवटाळून बसतो. संगीत हा त्या पलीकडचा महासागर आहे. सर्वांनी एकत्र आल्यास संगीताचे महाकाय रूप प्रत्येक घराण्याच्या दृष्टिकोनातून अनुभवता येईल, अशी ‘सहेला रे’ मागील संकल्पना होती.  - अमोल पालेकर

मी ३-४ वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा किशोरीताई होत्या. आज प्रकर्षाने त्यांची उणीव जाणवत आहे. त्यांचे गायन आजही मनात आहे.    - उस्ताद रशीद खाँ

टॅग्स :Puneपुणे