शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कॅन्सर रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहर मामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 3:19 PM

११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर मामा भोसले यास १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती

ठळक मुद्देभोसलेला पाहण्यासाठी त्याच्या समर्थक, भक्तांसह सह उत्सुकतेपोटी नागरीकांनी मोठी गर्दीपोलिसांनी न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलीस कोठडीत न्यायाधीश एन.व्ही रणवीर यांनी तीन दिवसांची वाढ केली आहे. ११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर मामा भोसले यास  १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता. बारामती जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांचे वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगणमत करून चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी (दि १०) सालपे (जि.सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन  ताब्यात घेतले आहे. उर्वरीत दोन आरोपी मात्र, अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्यांना अटक करावयाची असून भोसले याच्याकडील गुन्ह्यातील रक्कम आणि अन्य बाबींचा तपास करावयाचा आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.पी.एन कुचेकर यांनी केली. त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. मनोहर भोसले याच्या वतीने अ‍ॅड.हेमंत नरुटे यांनी काम पाहिले.

दरम्यान गुरुवारी(दि १६) देखील न्यायालयाबाहेर मनोहरमामा भोसलेला पाहण्यासाठी त्याच्या समर्थक, भक्तांसह सह उत्सुकतेपोटी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय