शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची मराठा आरक्षण शांतता रॅली; पुण्यातील वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:12 AM

जेधे चौक परिसर, सोलापूर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जेएम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक यामध्ये बदल केले आहेत

पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ११) शहरात मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅली काढण्यात येणार आहे. यादरम्यान काेंडी हाेऊ नये, यासाठी शहरातील वाहतुकीत बदल केले आहेत. यात जेधे चौक परिसर, सोलापूर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जेएम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल केले जातील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

मराठा आरक्षण शांतता रॅली रविवारी सकाळी सारस बाग येथून निघून पुरम चौक - बाजीराव रोड - शनिपार - सेवा सदन चौक - आप्पा बळवंत चौक - फुटका बुरुज - गाडगीळ पुतळा - शिवाजीपूल - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - एसएसपीएमएस - स. गो. बर्वे चौक - डावीकळे वळण घेऊन जंगली महाराज रोडने झाशीराणी चौक - नटराज चौक - गरवारे पूल - छत्रपती संभाजी पुतळा येथे पाेहाेचेणार आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियाेजन करण्यात आले आहे. रॅली जस जशी पुढे जाईल त्याप्रमाणे पाठीमागील चौक वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, असेही वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

असा असेल बदल

- नवले पूल - वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळवण्यात येईल.- खडीमशीन चौक - जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटाकडे जातील.

- कात्रज चौक ते होल्गा चौकदरम्यान रॅली पुढे जाईल, तसतशी वाहतूक सोडण्यात येईल.

सिंहगड रस्ता

- जेधे चौक ते सिंहगड रोड वाहतूक व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक व सावरकर चौक अशी जाईल.

- दांडेकर पूल - सिंहगड रोडकडून येणारी वाहतूक दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व व्होल्गा चौक अशी जाईल.- निलायम पुलाखाली - सावरकर पुतळ्याकडे वाहतूक बंद राहील.

- ना. सी. फडके चौक - सणस पुतळ्याकडे वाहतूक बंद राहील.- एस. पी. कॉलेज चौक - पूरम चौकाकडे वाहतूक बंद राहील.

जेधे चौक

- शिवाजी रोड - राष्ट्रभूषण चौक - वाहने वेगा सेंटर मार्गे जातील.- सेवन लव चौक - जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहील. (वाहतूक नेहरू रोडने मार्केटयार्ड किंवा पुणे स्टेशनकडे जाईल)

सातारा रोड

- मार्केटयार्ड जंक्शन - जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहील. (वाहतूक वखार महामंडळ मार्गे जाईल)- पंचमी चौक - पंचमी चौक ते जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहील. (पंचमी ते शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिर चौक ते निलायम टॉकीज मार्गे जाईल)

- शिवदर्शन चौक मित्रमंडळ चौकाकडे वाहतूक बंद राहील.

रॅली निघाल्यानंतर करण्यात येणारे बदल

- शनिपार चौक - कुमठेकर रोड, शनिपार चौक वाहतूक बंद राहील.

- बेलबाग चौक - लक्ष्मी रोड बेलबाग चौक वाहतूक बंद राहील.- केळकर रोड - टकले हवेली चौक - अप्पा बळवंत चौकाकडे वाहतूक बंद राहील.

- बुधवार चौक - अप्पा बळवंत चौकाकडे वाहतूक बंद राहील.- जिजामाता चौक - फुटका बुरूज कडे वाहतूक बंद राहील.

- जयवंतराव टिळक पूल - शनिवार वाड्याकडे वाहतूक बंद राहील.- कुंभार वेस चौक - गाडगीळ पुतळाकडे वाहतूक बंद राहील.

- मंगला टॉकीज - प्रीमिअर गॅरेजकडे वाहतूक बंद राहील.- शिवाजी पुतळा चौक - शिवाजीनगर कोर्टकडून येणारी वाहतूक बंद राहील.

- स. गो. बर्वे चौक - संपूर्ण वाहतूक शिमला ऑफीस चौक मार्गे जाईल.- रेव्हेन्यू कॉलनी जंक्शन - मॉर्डन चौकाकडे वाहतूक बंद राहील.

- झाशी राणी - सावरकर भवन चौक वाहतूक ओंकारेश्वर पूल मार्गे जाईल.- महात्मा फुले संग्रहालय - झाशी राणी चौकाकडे वाहतूक बंद राहील.

रॅली जंगली महाराज रोडवर आल्यानंतर...

- गुडलक चौक - नटराज चौकाकडे वाहतूक बंद राहील. (भांडारकर रोडकडून येणारी वाहतूक एफसी रोड मार्गे जाईल)- झेड ब्रीज - केळकर रोड वरून वाहतूक बंद राहील.

- भिडे पूल - पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडला वाहतूक बंद राहील.- नळस्टॉप चौक - खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील.

- रसशाळा चौक - एस. एम. जोशी पुलाकडील वाहने नळस्टॉप मार्गे जातील.- डेक्कन पोलिस ठाणे (शेलारमामा चौक) - शेलारमामा चौकाकडून खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील.

रॅली खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर...

टिळक चौक - खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील. (वाहतूक कुमठेकर रोड व टिळक रोड मार्गे सोडली जाईल)---

 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती