पुणे: मनोज जरांगे पाटील यांची हिंदीत बोलत असल्याची एक व्हिडीओ क्लीप ऐकवत, त्यांना हिंदी बोलणे जमत नाही. ते अकलेने दिव्यांग झाले आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे प्रशासन एक नंबर आहे. अधिकाऱ्यांनी तसे काम केले पाहिजे. मला येवल्याचं वेडपट म्हणत आहे. पण जरांगे यांचा जन्म झाला होता का नव्हता, तेव्हा मी महापौर आणि आमदार झालो. तेही दोनदा झालो. जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखवावे, असे आव्हान देत
त्यांच्या डोक्यात हवा गेली असल्याची टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे शनिवारी केली.
नगर परिषदेच्या मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते.
आमच्याकडे ८० टक्के
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्याकडे २० टक्के, तर आमच्याकडे ८० टक्के मते असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही शुद्र, मग आमचे आरक्षण का मागता?
मी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन गेल्यानंतर तो रस्ता गोमूत्राने धुतला गेला. आम्ही शुद्रच आहोत शुद्रच राहू द्या पण आमचे आरक्षण का मागता आम्ही शूद्र आहोत. आम्हाला शूद्रच राहू द्या, तुम्ही उंचीवर रहा. आम्ही शुद्र आहोत, तर आमचे आरक्षण का मागता? असा सवालही मंत्री भुजबळ यांनी केला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, काकडे, जाचक यांना विचारा कुणबी दाखला हवा आहे का? आणि नको असल्यास पुढे येऊन सांगा. निवडणुकीत मते मिळणार नाहीत म्हणून मोठे नेतेही बोलत नसल्याचे भुजबळ म्हणाले.