शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भिडे गुरुजींच्या तोंडून मनुवाद पेरला जातोय : डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 9:24 PM

कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे..

ठळक मुद्देनामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार

पुणे : पँथर चळवळ म्हणजे सत्याचा आणि आशेचा किरण आहे. पँथर आज तुकड्यांमध्ये विखुरलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन एकीकडे जातीयवादी षड्यंत्र पेरले जात आहे, तर दुसरीकडे भिडे गुरूजींच्या तोंडून मनुवाद पेरला जात आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकसंध राहण्याची गरज आहे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.फुले-शाहू- आंबेडकर विचार मंचतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त सबनीस यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पद्मश्री नामदेव ढसाळ पँथर साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रवींद्र माळवदकर, नगरसेविका लता राजगुरू, पँथर नेते यशवंत नडगम आणि पँथर नेते प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘सामाजिक जीवनात टोकाची विषमता आणि गरिबी पाहून नामदेव ढसाळांना नेहमी वेदना व्हायच्या. त्यामुळे त्यांची भाषा काहीवेळा खूप टोकाची वाटायची. त्यांचे साहित्य हे केवळ साहित्य विश्वापुरते मर्यादित न राहता  आर्थिक आणि राजकीय क्षेत्रही त्यांच्या साहित्याने पादाक्रांत केले. त्यांची कविता चौकटबद्ध रसिकतेला उद्ध्वस्त करणारी होती. नामदेव ढसाळ हे पँथर चळवळीचे प्रेरणास्थान होते.’ ‘नामदेव ढसाळ हे महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेतील प्रगल्भ आणि विद्रोही वास्तववादी कवी होते. त्यांच्या कवितेत केवळ विद्रोह नव्हता, तर क्रांतीची बिजे होती. ढसाळांच्या कवितेची भाषा सडेतोड होती; मात्र त्याला गौतम बुद्ध आणि आंबेडकरांच्या विचारांचा पाया होता. नामदेव ढसाळांची कविता ही युगप्रवर्तक ठरली’, असेही सबनीस म्हणाले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि दादासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी