पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान विद्यार्थी आघाडीचे आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडीचे विद्यमान अध्यक्ष कल्पेश यादव यांनीही आज मुंबई वर्षा निवासस्थान येथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कल्पेश यादव है पूर्वाश्रमीचे शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या हवेली तालुका प्रमुख पदी म्हणून काम करत असताना २००५ साली राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरे बरोबर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गेल्या सोळा वर्ष काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी आघाडीच्या सरचिटणीस विद्यमान शहराध्यक्ष आदी पदांची जबाबदारी पार पाडली आहे.
तसेच गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून पुणे शहरातील स्पर्धा परीक्षा व इतर विद्यार्थ्यांच्या समस्या साठी विविध आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुणे शहरातील कोरोना काळात बाहेर शहरातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दोन वेळच्या भोजनाची सोय कल्पेश यादव यांनी केल्याने ते प्रकाशझोतात आले होते. आज शिवसेनेमध्ये वरून सरदेसाई यांच्या पुढाकारातून कल्पेश यादव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कल्पेश यादव यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसे पुणे शहराला अजून एक मोठा धक्का मानला जात आहे.
''बेरोजगारी व विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.''