शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अनेक शाळांकडून प्रवेशाचा श्रीगणेशा; शिक्षणावर राज्य शिक्षण विभागाचे नियंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 5:07 AM

राज्यभरात पेव फुटलेल्या प्ले गु्रपपासून सिनिअर केजीपर्यंतच्या अनेक शाळांमध्ये प्रवेशाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. कसलेही बंधन नसलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक पालकांचीही ‘परीक्षा’ सुरू झाली आहे.

पुणे : राज्यभरात पेव फुटलेल्या प्ले गु्रपपासून सिनिअर केजीपर्यंतच्या अनेक शाळांमध्ये प्रवेशाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. कसलेही बंधन नसलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक पालकांचीही ‘परीक्षा’ सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पूर्वप्राथमिक शिक्षण कायदा मात्र गुलदस्त्यातच आहे. परिणामी यंदाचे पूर्वप्राथमिकचे प्रवेशही कोणत्याही आडकाठीशिवाय सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे.राज्यातील शिक्षण विभागाकडे इयत्ता पहिलीपासून शिक्षणाची जबाबदारी आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणावर या विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. राज्यात असणाºया अंगणवाड्यांची जबाबदारी महिला व बालशिक्षण विभागाकडे आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यासह राज्यात सर्वत्र प्ले ग्रुप, नर्सरीपासून सिनिअर केजीपर्यंत शिक्षणासाठी समांतर यंत्रणा उभी राहिली आहे. अनेक बड्या शाळांना पूर्वप्राथमिकचे हे वर्ग जोडले गेले आहेत, तर काहींनीकेवळ प्ले ग्रुप ते सिनिअरकेजीपर्यंतचे शिक्षण मर्यादित ठेवले आहे. मात्र, या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही विभागाची परवानगी घ्यावी लागत नाही. तसेच या शिक्षणावरही शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या शाळांचे जणू पेव फुटले आहे.तर काही शाळा केवळ प्रवेशाच्या चौकशीसाठी पालकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेत आहेत. त्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली असून, त्यानंतर टप्प्याटप्याने पालकांना प्रवेशासाठी बोलावले जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक पालक स्वत:हून विविध शाळांकडे प्रवेशाची चौकशी करताना दिसत आहेत.कायदा या वर्षीही नाहीपूर्वप्राथमिकचा कायदा करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी शिक्षण संचालकांच्या (प्राथमिक) अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्वप्राथमिकच्या मान्यतेपासून परीक्षेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. हा मसुदा अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो राज्य शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विधी विभाग तसेच इतर विभागांच्या मान्यता, त्यावर हरकती-सूचना मागवून हा कायदा अंतिम केला जाईल. मात्र, त्याला काही महिन्यांचा कालावधी जावा लागेल. परिणामी हा कायदा येत्या शैक्षणिक वर्षातही लागू होऊ शकणार नाही, असे दिसते.बहुतेक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पूर्वप्राथमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून सुरू होते. पुणे शहरात काही शाळांनी दि. १ नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. काही शाळांच्या संकेतस्थळावर या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार पालकांची धावपळ सुरू होऊ लागली आहे. काही शाळांनी आदी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पालक व बालकांना शाळेत बोलावून पुढील प्रक्रिया केली जाईल.पूर्वप्राथमिक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे मागील काही वर्षांपासून पुढे येत आहे. प्रवेशासाठीलागलेल्या रांगा, भरमसाठ शुल्क यामुळे पालक त्रस्त होऊन जातात. अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी तर रात्रभर रांगा लावाव्या लागत असल्याचे अनेकदा दिसून येते. या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या काळापासून पूर्वप्राथमिक शिक्षणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. चार-पाच वर्षांपूर्वी याबाबत एक समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीने ‘महाराष्ट्र पूर्वप्राथमिक शिक्षण कायदा’ असे या कायद्याचे नावही सुचविले होते. तसेच या शाळांना मान्यता, शुल्क, अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया याबाबतही शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पूर्वप्राथमिकनंतरचे शिक्षण, शुल्क, घरापासूनचे शाळेचे अंतर, शाळेतील सोयीसुविधा अशा विविध बाबींची चाचपणी करावी लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच शोधाशोध सुरू केली आहे. आता बहुतेक पालक प्ले ग्रुपपासूनच मुलांना शाळेत टाकतात. त्यामुळे प्रवेशासाठी चढाओढ असते. त्यामुळे अनेक पालक तर वर्षभर आधीपासूनही चौकशी सुरू करतात.- एक पालक‘सीबीएसई’च्या शाळा एप्रिल महिन्यापासून सुरू होतात. त्यामुळे अनेक शाळा पूर्वप्राथमिकचे प्रवेश नोव्हेंबरपासून सुरू करतात. प्रवेश प्रक्रियेसह पालक-मुलांना मार्गदर्शन केले जाते. इतर तयारीसाठीही शाळांनावेळ द्यावा लागत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरपासूनप्रवेश सुरू केले जातात. तर राज्य मंडळाच्या शाळा जूनपासून सुरू होत असल्याने त्यांची प्रक्रिया उशिराने असते. कायदा आवश्यक असला तरी त्याबाबत अद्याप काहीच हालचाल नाही.- राजेंद्र सिंग, सचिवइंडिपेंडन्ट इंग्लिश स्कुल असोसिएशन

टॅग्स :Schoolशाळा