निमोणे : शिरूर तालुक्याने राबवलेले अनेक लोकोपयोगी उपक्रम हे राज्य व देशाला मार्गदर्शक ठरले असून त्या ठिकाणी याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले.
चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व शिरूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर वृक्षरोपण व शोष खड्डे बनवणे आदी कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चव्हाणवाडी लंघेवाडी ग्रामस्थांनी सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रूबी हॉल क्लिनिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी युवा ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी या छोट्याशा गावामध्ये ४१ पिशव्या रक्त संकलित झाले. त्याच प्रमाणे शिरूर तालुका ग्रामसेवक युनियनच्या सहकार्याने वृक्षलागवडीचा 'बिहार पॅटर्न' राबवत तब्बल अडीचशे वृक्ष लागवडीच्या कामाचा व त्यांना संरक्षण जाळी बसवण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी वड, पिंपळ अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर गावातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ५० शोषखड्डे घेण्याचे काम सुरू केले.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्र काळे, पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, सरपंच संतोष लंघे, उपसरपंच स्वातीताई हराळे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, शिरूर तालुका अध्यक्ष रमेश जासूद, महेंद्र जासुद, वैभव जगदाळे, अक्षय बांदल, किरण चव्हाण, निलेश लोखंडे, प्रभावती गरुड वैशाली चव्हाण, ग्रामसेविका सारिका दरेकर उपस्थित होते.
--
२८निमोणए वृक्षारोपण
चव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वृक्षारोपण करताना पदाधिकारी