बारामती : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा व्यवसाय बंद आहे.यामध्ये केशकर्तनालय देखील अपवाद नाहीत.एक महिन्यापासुन केशकर्तनालय बंद असल्याने घरातील पुरुष,मुलांचा अवतार झाला आहे. लॉकडाऊन हटण्याची वाट पाहुन शेवटी आता महिला वर्गानेच पुढाकार घेत हाती कात्री ,झिरो मशिन घेतल्याचे चित्र आहे. लॉकडाउनचे निमित्त साधत अनेक तरुणांनी टक्कल केले आहेत. त्याचे ‘कोरोना कट’म्हणून सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. काही मंडळींनी झिरो मशिनच्या सहाय्याने पूर्ण टक्कल न करता, केस बारीक करण्यावर भर दिला आहे.शहरात आता लॉकडाउन संपण्याची वाट न पाहता घरातच विशेषत: लहान मुलांचे'केस कटिंग' सुरू झाल्याचे चित्र आहे. कोरोनाचे संकट वाढल्यानंतर राज्यात तातडीने संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सर्वत्र लॉकडाउनझाले. त्यामुळे महिनाभरापासुन शहरातील केशकर्तनालये बंदच आहेत. त्यामुळे केवळ पुरुष,मुलांची चांगलीच धांदल उडाली आहे. २० एप्रिलच्या सरकारीनिर्णयामध्ये केशकर्तनालयाला सुट मिळण्याची अपेक्षा होती.मात्र, शासनाने जाहिर केलेल्या निर्णयानुसार केशकर्तनालय ३ मे पर्यंत तरी बंद राहणारआहेत. अनिश्चितता वाढल्याने घरीच पयार्यी व्यवस्था करण्यास नागरीक प्राधान्य देत आहेत. लॉकडाउनचे निमित्त साधत अनेक तरुणांनी टक्कल केले आहेत.त्याचे कोरोना कट म्हणून सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. काही मंडळींनी झिरो मशिनच्या सहाय्याने पूर्ण टक्कल न करता, केस बारीक करण्यावर भरदिला आहे. गुगल आदीवर अपेक्षित कट करण्यासाठी आवश्यक शोध घेवुन तरुणांचेकेस कापण्याची जबाबदारी घरातील महिला वगार्ने घेतलेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे काहींचा अवतार बदलण्यासाठी घराजील ज्येष्ठांनी दरडावुन केस कमीकरण्याची ताकीदच दिल्याचे चित्र लॉकडाऊनच्या निमित्ताने पहायला मिळाले.शहरातील निलेश गवारे या तरुणाने त्याच्या बहिणीची मदत घेवुन पूर्ण केस कमी करण्याचा पर्याय अवलंबला.शासकीय,खासगी कंपन्यातील कर्मचारी,अधिकारी वर्ग ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूअसल्याने व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुळ अवतारासहसहभागी होत आहे. काहींनीवाढलेल्या दाढीमिशा ंचा फायदा घेवुन ह्यलुकह्ण बबदलण्यास सुरवात केलीआहे.त्याचा सेल्फी ट्रेंड देखील सोशल मीडियावर सुरु झाला आहे. केस रंगवणे शक्य नसल्याने अनेकांना पांढरे केसासह वावरावे लागत आहे. केस रंगवुनवाढलेले वय लपवणे अवघड झाल्याचे विनोद सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतात.———————————
लॉकडाउनच्या काळात घरीच केलेले ‘कोरोना कट’ सोशल मीडियावर 'सुपरहिट' ; महिला वर्गाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 7:13 PM
लॉकडाउनचे निमित्त साधत अनेक तरुणांनी टक्कल केले...
ठळक मुद्देलॉकडाउन संपण्याची वाट न पाहता घरातच विशेषत: लहान मुलांचे 'केस कटिंग' सुरू