शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 6:09 PM

आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना...

ठळक मुद्देसनातनवर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवासरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा चांगला . सरकार कोणाचेही असो माध्यमांमधून वास्तव मांडले जाणे गरजेचे

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्यांच्यासारखे अनेक तरुण सध्या समाजात आहेत. सनातनसारख्या कट्टरतावादी संस्थांच्या वाढत्या कारवाया घातक असून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.        पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळे ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, कार्यवाहक विठ्ठल जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी आमदार मोहन जोशी, परीक्षक प्रा. प्रकाश पवार, अ‍ॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते आरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, सदानंद शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.      विखे म्हणाले, आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना. सनातनी प्रवृत्ती असलेल्या संस्थांनी आंदोलने केले. त्यातून अंदुरे व कळसकर घडले आहेत. त्यामुळे या संघटनेला ठेचून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सरकारची इच्छा शक्ती दिसत नाही. एटीएसने डॉ. दाभोलकर हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन देखील केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या संघटनांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.      राज्यातील सध्यस्थितीबाबत विखे-पाटील म्हणाले की, पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे  शेती हा विषय राजकीय नाही तर संशोधनात्मक दृष्टीकोनातून मांडला पाहिजे. कृषी विद्यापीठांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत काहीच पोहचले नाही. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री असे सर्वच शेतक-यांविषयी बोलतात. मात्र, शेतक-यांसाठी आवश्यक असलेल्या कृती होताना दिसत नाहीत. चुकीचे निकष काढून कर्जमाफी करण्यात आली. मराठा आदोलन फोडण्यात सरकारला यश आले आहे.      चंद्रकांत पाटील सर्वार्थाने दादा सगळ्याच गोष्टींसाठी चंद्रकांत पाटील यांना पाठविले जाते. त्यांना देखील पुढे याचा फायदा होणार याची माहिती असल्याने ते पुढे येतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे सर्वार्थाने दादा आहेत. सरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा चांगला प्रभाव पडला आहे, असे विखे-पाटील म्हणाले.  पत्रकार संरक्षणाचा मुद्दा मांडणार     पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारांना सर्व बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षिततेचा मुद्दा मी आगामी अधिवेशनात मांडणार असून यासंबंधीचा अहवाल त्वरीत केंद्राला पाठवावा, यासाठी आग्रही राहणार आहे. कितीही इतर माध्यमे आली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व कायम राहणार आहे. सरकार कोणाचेही असो माध्यमांमधून वास्तव मांडले जाणे गरजेचे आहे, असे विखे-पाटील म्हणाले. ................

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेस