पुणे: घटनेत बदल करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी नॉरेटिव्ह सेट करण्यात येत आले. आरक्षण हा राजकीय विषय आहेत. कुणालाही न दुखवता सगळ्यांना आरक्षण कसे देता येईल, यासाठी महायुतीच्या वतीने प्रयत्न केला जाईल’’ मराठा समाजासह सर्व वंचित घटकातील बांधवाना आरक्षण मिळायला हवे असे नवनिर्वाचित विधानसभेचे आमदार अमित गोरखे यांचा पुणे नवी पेठ येथे वार्तालाप पुणे श्रमिक पत्रकार संघा तर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सांगितले. तसेच ‘‘ कोणत्याही समाजाला न दुखविता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,’’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
भाजपाने केले थेट आमदार
‘‘मला विधान परिषदेवर संधी मिळण्यामागे सर्वात मोठा वाटा हा माझ्या समाजाचा आहे. त्यानंतर माझ्या आई-वडिलांचा आहे. गरीब कुटुंबातून मी पुढे आलो. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काम मी करीत आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार मला २०१२ साली मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळी भेट झाली हाेती. त्यानंतर मी राजकीय जीवनास सुुरुवात केली. आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने मातंग समाजाला विधान परिषदेवर थेट संधी दिली नाही. परंतु भाजपाने हे करून दाखविले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसांपर्यंत मला अशी संधी मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र भाजपाने मला थेट आमदारपदीची संधी दिली हे भाजपाच करू शकते.
वंचित घटकासाठी प्रयत्न
अनुसुचित जातीतील विधान परिषदेचा आमदार केवळ समाजामुळे झालाे आहे. त्यामुळे पुढील काळात मागासलेल्या ५९ जातींसाठीच काम करणार आहे. शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही. या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार आहे. आरटीईचे अनुदानास शासनाला विलंब होत आहे. गेले ८ ते १० वर्ष सरकारचे खाजगी संस्था अनुदान दिले नसल्याने शाळाचे नुकसान होते आहे.यामुळे शिक्षणसंस्थांची मोठी कुचंबणा होते. त्यादृष्टीने विशेष प्रयत्न करणार असल्याचे गोरखे यांनी सांगितले.