पुणे - मराठी माणसाकडे अंगभूत कलागुण असतात. त्यांना मार्केटिंगची जोड दिली, तर त्याचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होऊ शकते. घरातून सुरु केलेल्या व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यावसायिकांनी आपले कार्यक्षेत्र वाढविले पाहिजे. नव्या माध्यमांचा आणि अशा प्रकारच्या फेस्टिव्हलचा वापर करून घ्यावा, असा सल्ला चितळे उद्योग समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चितळे यांनी दिला.मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, कºहाडे ब्राम्हण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल, पुणे येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या 'भारी भरारी' या फन फूड शॉपिंग फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी चितळे बोलत होते. याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, निवेदक सुधीर गाडगीळ, अभिनेते रवींद्र मंकणी, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, वाडेश्वरचे जयंत जोशी, श्रीपाद करमरकर, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, सुमुख आगाशे, प्रसाद पटवर्धन, राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, अभिजित देशपांडे उपस्थित होते. सुधीर गाडगीळ म्हणाले, नव्याने व्यवसाय करणाºया आणि छोट्या व्यावसायिकांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून घेत आपले उत्पादन व सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी कारवा. एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि लहान मुलांना नेहमी प्रिय असणाºया धम्माल गेम्स याठिकाणी असणार आहेत. (वा. प्र.)संगीतसंध्या आणि मातीकाम प्रात्यक्षिकेफूड फेस्टिवल ७ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत ग्राहकांसाठी खुले असणार आहे. शनिवारी (दि. ६) संध्याकाळी ७ वाजता चंद्रशेखर महामुनी यांच्या सुमधुर संगीताचा कार्यक्रम होणार आहे. चैताली माजगावकर भंडारी यांचा ५ ते ८ या वेळेत पपेट शो (खेळ बाहुल्यांचा) होणार आहे. तर चेतन केतकर यांच्याकडून मातीची भांडी बनवायला शिकता येणार आहे.
मराठी व्यावसायिकांनी कार्यक्षेत्र वाढवावे, श्रीकृष्ण चितळे यांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:26 AM