शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सातासमुद्रापार गर्जते मराठी संस्कृती, अमेरिकेत झाला ढोलांचा दणदणाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:12 AM

गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला.

- तुषार सोनवणेपुणे : गणेशोत्सवाचा जागर महाराष्ट्रातच नव्हे तर आता सातासमुद्रापारही होत आहे. भारतीय सणांचे आकर्षण परदेशातील नागरिकांमध्येही प्रचंड आहे. त्यामुळे अमेरिकेतही गणरायासमोर ढोलांचा दणदणाट झाला.अमेरिकेतील मिसिगन आणि ओहिओ येथील भारतीय व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार ते गणरायाची प्रतिष्ठापना करतात. यंदा गणरायांचे आगमन तिथे झाले आणि त्यांच्यासमोर ढोलांचा दणदणाटही झाला. कारण पुण्यातून अमेरिकेत ढोल नेण्यात आले आहेत. अमेरिकेतील नागरिकांना आता ढोलांचा गरजही ऐकायला मिळत आहे. मिसिगन या ठिकाणी भारतीयांनी एकत्र येवून शिवशार्दुल ढोलताशा पथक स्थापन केले आहे. या पथकाचे उद्दिष्ट म्हणजे एकमेकांमधील नात्यांचे बंध घट्ट करणे होय. तसेच आपली संस्कृती जपणे. अमेरिकन भारतीय तरुण वर्गात आपल्या भारतीय पारंपरिक वाद्यांची गोडी निर्माण व्हावी आणि भारताबाहेर आपली संस्कृती रूजावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.शिवशार्दुलमधील सभासदांनी स्वत:हून पैसे काढून भारतातून वाद्ये तिथे नेली. सुरुवातीला चार ते पाच ढोल आणले होते. नंतर टप्प्याटप्प्याने ढोल आणण्यात आले. सध्या पथकाकडे ३५ ते ४० ढोल आहेत. पण तालमींसाठी मात्र त्यांना बऱ्याच दिव्यातून जावे लागले. ‘ढोल-पथकाची तालीम म्हणजे मोठा आवाज असणारच. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार.शेवटी तिथे एका पार्कमध्ये वादनाचा सराव करण्याची परवानगी मिळाली. ढोलताशे वाजवणे आणि ते वाजवण्यास शिकवणे हे अवघड काम होते. सुरुवातीला त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती यू-ट्युबवर शिकून त्यानंतर पथकाचा बाकी वादकांना शिकवून पथकाची सुरुवात झाली.सरावासाठी लहानथोर सहभागी१ अमेरिकेत थंडीचा हंगाम संपताच पथकाकडून सरावाला सुरुवात केली जाते. शाळकरी मुला-मुलींपासून ते कॉलेजला जाणारे, नोकरी करणारे, महिला अशा वेगवेगळ्या वयांचे सभासद पथकात आहेत.२ पातीला मेण लावणे, ढोलाच्या दोºया आणणे, फुटलेल्या पातीच्या जागी दुसºया पाती देणे, ढोल ताणणे, ताशा पान आवळणे यावर रीतसर काम करणे आणि सरावाच्या काळात खास लक्ष दिले जाते.३ वादनाबाबत टिपरू मेणावर बसत नसेल, थापी वाजत नसेल तर वादनाच्या तांत्रिक बाबी शिकवल्या जातात. अनंत केंडळे, कपिल गुटाला, मिलिंद कुलकर्णी, अनुप गोंगले यांनी २०१५ साली पथकाची स्थापना केली. तसेच तुषार देसले, सागर खैरे हे सराव घेतात.

टॅग्स :marathiमराठीcultureसांस्कृतिक