पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेक-यांना सरकार पकडेल, ही आशा व्यर्थ आहे. आम्हांला पोलीस इकडून जा, तिकडून जा, असे नियम दाखवितात, मात्र मारेकºयांना पकडू शकत नाहीत. त्यांना राजाश्रय मिळाल्यानेच पकडणे अवघड असल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली.अंनिसच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकºयांना सरकारने पकडावे, यासाठी निर्दशने केली जातात. मंगळवारी झालेल्या निर्दशनांमध्ये बाबा आढाव, दिग्दर्शक अतुल पेठे, पुणे मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष उदय भट, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, दीपक गिरमे, शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधाव, शांताबाई रानडे आदी उपस्थित होते.सध्या विरोधकांचे आवाज संपविण्याचे कारस्थान सुरूआहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार अघोषित आणीबाणीचआहे याविरोधात सगळयांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले.
मारेक-यांना राजाश्रय मिळाल्यानेच पकडणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:33 AM