राजगुरुनगर : दोंदे (ता. खेड) येथील एका विवाहितेने सासरची माणसे छळ करतात म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासू, सासरे, दीर आणि जावांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील सुजाता गोविंद आल्हाट ( वय 26) हिचे दोंदे येथील विजय मनोहर बनकर याच्याशी 2क्क्6 साली लग्न झाले होते. लग्नानंतर ती शेतात कामास जात नाही म्हणून सासू ,सासरे, दीर व जावा तिला मारहाण करीत होते.
शेतीचे काम येत नाही, प्रापंचिक खर्चासाठी पैसे आणावेत म्हणून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याने तिने 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासू कमल मनोहर बनकर, सासरे मनोहर पांडुरंग बनकर, जाऊ सविता राजेंद्र बनकर , शीतल संपत बनकर, दीर राजेंद्र मनोहर बनकर, संपत मनोहर बनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
4तिचा पती काही कामधंदा करीत नाही याबद्दलही तिला टोचून बोलत असे. नव:याचे आणि तिचे संबंध चांगले होते. दरम्यान तिला एक मुलगाही झाला. परंतु शेतात काम करत नाही म्हणून तिचा छळ चालूच होता. त्याला कंटाळून तिने चार वर्षापूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रय} केला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना 9क्क्क्क् रुपये दिले आणि महिन्याला 5क्क्क् रुपये देण्याचे ठरले. तरीही तिचा छळ चालू होता. ती माहेरच्यांना तिला माहेरी घेऊन जावे असे विनवित होती. सध्या ती गरोदर होती. तिने पुन्हा माहेरी न्यावे असे सांगितले, पण त्यांनी तिची आई येथे राहायला येईल, अशी समजूत काढून सासरीच ठेवले.