मंचर : राज्यात अग्रेसर असलेली मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकºयांना चांगल्या सुविधा देत आहे. शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी बाजार समित्या हा घटक महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती देवदत्त निकम होते. यावेळी देवेंद्र शहा, विवेक वळसे-पाटील, उषा कानडे, अरुणा थोरात, जयसिंगराव एरंडे, विष्णू हिंगे, बाबूराव बांगर, बाळासाहेब बाणखेले, प्रकाश घोलप, नीलेश थोरात, दत्ता थोरात उपस्थित होते.
सभापती देवदत्त निकम म्हणाले, ‘‘शेतकºयांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बाजार समिती आवारात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यात यश आले आहे. सुरक्षारक्षकाद्वारे वाहतूक सुरळीत केली जाते. बाजार समितीतील काही प्रलंबितकामे नजीकच्या काळात मार्गी लागणार आहेत. पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे. जनावरांचा बाजार चांडोली अथवा लोणी येथे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. याप्रसंगी जयसिंगराव एरंडे, संजय मोरे यांची भाषणे झाली. यावेळी झालेल्या चर्चेत के. के. थोरात, वनाजी बांगर, प्रभाकर बांगर यांनी सहभाग घेतला. सहायक सचिव सचिन बोºहाडे यांनी अहवालवाचन केले. संचालक दत्ता हगवणे यांनी सूत्रसंचालन केले.मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती चांगला कारभार करीत आहे. त्याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन. बाजार समितीला ३ कोटी ९६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकºयांना संरक्षण देण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. शेतकरी नडला जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, शेतकºयांची फसवणूक रोखण्यासाठी बाजार समित्या हा महत्त्वाचा घटक आहे, असे सांगून वळसे-पाटील म्हणाले, शेतकरी, व्यापाºयांना बाजार समितीने अधिकाधिक सुविधा द्याव्यात.- दिलीप वळसे-पाटील, माजी विधानसाध्यक्ष