पालेभाज्यांच्या आवकेत वाढ झाल्यामुळे बाजारभाव तेजीत निघाले .
मिरची, कारली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर असल्याने भाव तेजीत होते. तर
टोमॅटो, वांगी, भोपळा , काकडी , कोबी , फ्लाॅवरच्या भावात घसरण झाली असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१६५ ) ८०. ते १५०, वांगी ( ७१ ) ५० ते १०० , दोडका (२५ ) २०० ते ३५०, भेंडी (३६ ) १५० ते ३५०, कार्ली (२९ ) २०० ते ३५० , हिरवी मिरची ( ५८ ) २०० ते ४००, गवार (१७ ) ३००ते ८००, भोपळा ( ४५ ) २५ ते ५० , काकडी ( ५९ ) ५० ते १५०, सिमला मिरची ( ३३ ) १५० ते २०० , कोबी ( २५०गोणी ) ४० ते ६० , फ्लाॕवर (३१५ गोणी) ७० ते १५० , कोथिंबीर (४५६३० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ६०० शेकडा, मेथी (५४३०जुडी) ३००ते ६०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ५७७ ) १६५० ते १९०० , ज्वारी ( ५२ ) , २००० ते २८०० बाजरी (५७ ) १२११ ते १८७५, हरभरा ( ३३ ) ४२०० ते ४५३१ मका ( ४ ) १४०० ते १४०० उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु (१७२ ) १६५० ते १८५१, ज्वारी ( ४ ) १५०० ते २५११, बाजरी ( ५० ) १२०० ते १७०० , हरभरा ( १० ) ४२०० ते ४६०० , मका( ७ ) १४०० ते १५८१ , तूर ( ४ ) ५४० ते ५७११