शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

भुसारमाल आणि भाजीपाल्याला लाॅकडाऊन फटका बसल्याने बाजारभाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:12 AM

-- दौंंड : दौंड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवकेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन फटका बसला असून दौंड आणि ...

--

दौंंड : दौंड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवकेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन फटका बसला असून दौंड आणि केडगाव येथे सर्वच प्रकारची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले आहे तर दुसरीकडे लाॕॅकडाऊनमुळे बाजार समितीचा उपबाजार यवत आणि पाटस गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असल्याने या उपबाजारातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.

गेल्या आठवड्यात पालेभाज्यांची आवक स्थिर झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले तर कोथिंबीर, मेथीची आवक कमी झाल्याने भाव तेजीत होते. दरम्यान टोमॅटो, वांगी, भोपळा, काकडी, कोबी, फ्लाॅवर या भाज्यांची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. मिरची, कारली, भेंडी, गवार, दोडक्याचे भाव तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी संयुक्तरित्या दिली

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१८१) ५० ते १५०, वांगी (७३) ५० ते १५० , दोडका (२९) १०० ते २५०, भेंडी (३४) १२० ते २००, कारली (३३) २०० ते ३००, हिरवी मिरची (६८) २०० ते ३५०, गवार (३१) २०० ते ३००, भोपळा (५२) ३० ते ५०, काकडी (५४) ५० ते १००, शिमला मिरची (३०) २०० ते ३५०, कोबी (३७० गोणी) ६० ते १३०, फ्लाॕॅवर (४४० गोणी) १०० ते १५०, कोथिंबीर (१०३७० जुडी) २०० रुपये शेकडा ते ५०० शेकडा, मेथी (२००० जुडी ५०० ते १२०० शेकडा).

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू. (१८४) १७०० ते २०००, ज्वारी (१३), १७०० ते २००० बाजरी (६०) १३०० ते १८००, हरभरा (१७) ४६०० ते ४७०० मका (३) १३०० ते १३०० , तूर (४) ५८०० ते ५८०० उपबाजार केडगाव -- गहू (२९४) १७०० ते १९२०, ज्वारी (१०९) २५०० ते ३१००, बाजरी (८५). १४ ०० ते १६००, हरभरा (५८) ४५०० ते ५१००, मका लाल पिवळा (२८) १३०० ते १६००, चवळी (३३) ८००० ते ८५००, मूग (४२) ७७०० ते ८१०० , तूर (७) ४५०० ते ५७००, लिंबू (३८) ५५१ ते ९०१.

[ चौकट ]

(केडगावला कांद्याची उच्चांकी आवक)

उपबाजार केडगाव येथे पाच हजार दोनशे क्विंटल अंतर्गत अकरा हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाल्याने ४०० ते १५०० प्रतिक्विंटल बाजारभाव निघाला. केडगाव येथे गेल्या पंधरवड्यात नव्याने कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने व्यापारी आणि शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.