नीरा :
ब्रेक द चेन अंतर्गत गेल्या महिनाभरापासून पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. तरीही महिनाभर नीरा (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजारादिवशी कमी- जास्त प्रमाणात व्यापारी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतच होते. काल बुधवारी मात्र अचानक मोठ्यासंख्येने भाजी विक्रेत्यांनी मंडईत गर्दी केली आणि जणूकाही आठवडे बाजारच भरला असे दिसू लागले. नीरा पोलिसांनी दुपारी बारा वाजता या बाजारकरूंना हटकत बाजार उठवून लावला.
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरामध्ये कोरोना रुगणांची संख्या दररोज वाढते आहे. येथील पोलीस प्रशासन गर्दी होऊ नये म्हणून दिवसभर प्रयत्नशील आहे. मात्र, तरी देखील येथील दररोजची गर्दी काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाही. नीरा शहर वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे आहे, तर आजूबाजूच्या १० ते १५ गावांतून लोक या बाजारपेठेत येत असतात. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू असतात. यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब कॉर्नर दरम्यानच्या रसत्यावर मोठी गर्दी होत असते.
नीरा पंचक्रोशीत दररोज दहा ते पंधरा कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शासनाने नीरा शहर व परिसरातील पाच गावे आधी 'रेड झोन' नंतर आता 'हाय ॲलर्ट' मध्ये समाविष्ट केली आहेत. तरी देखील नीरा येथील आठवडे बाजार बुधवार दि. १२ मे रोजी भरल्याचे पाहायला मिळाले. दररोज सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत नियमित भाजी मंडई भरते, तरीही दर बुधवारी थोड्या प्रमाणात का होईना बाजर भरतोच. परिसरतील सर्व गावांतील लोक दररोज काहीना काही खरेदी करण्याच्या कारणाने नीरा शहरात येतातच. दररोज ताजी भाजी मिळतेच, तरी पण आठवडे बाजारात गर्दी का होते, हा प्रश्न निर्माण होत आहे.
बुधवारी आठवडे बाजारात ठेकेदाराने बाजारकराची वसुली केली, त्यामुळे येथील व्यापारी बिनधास्तपणे बाजार भरवताना दिसले. ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे सोईस्करपणे डोळेझाक करत आहे. आणि लोकांना कोरोनाच्या खाईत लोटत आहे. आज बुधवारच्या दिवशी आठवडे बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र दुपारी बारा वाजले, तरी ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नीरा पोलिसांनी चारचाकीतून सायरन वाजवून सूचना देत बाजारकरूंना हटकले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा
जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी आठवडे बाजार न भरवण्याचे आदेश दिल्यानंतरही नीरेचा आठवडे बाजर भरतो आणि विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या बाजार करवसुली ठेकेदाराकडून येथे करही वसूल केला जातो. नुकतेच नीरा ग्रामपंचायतीने आठवडे बाजाराच्या करवसुलीचा ठेका दिला गेला आहे. ठेका लिलाव पद्धतीने न करता गुपचूप केले गेला. त्यामुळे ठेकेदार बुधवारी ही सर्रास वसुली करत पावती देतो. त्यामुळे एक प्रकारे हा आठवडे बाजार नियमानेच सुरू असल्याची भावन बाजारकरूंची झाली होते.
निरेच्या मुख्य मंडईत गर्दी का झाली?
गेल्यावर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर काही भाजी विक्रेत्यांनी नीरेच्या आठवडे बाजाराला पर्यायी मंइई गावाबाहेर भरवायला सुरुवात केली. ती मंडई बारामती तालुक्याच्या हद्दीत गेली वर्षभरापासून भरवली जात आहे. आठवडे बाजारादिवशी या मंडईत मोठ्या प्रमाणावर व्यापारी कवडीमोल भावाने शेतमाल घेऊन चढ्या दराने विक्री करत. मागील दोन आठवडे झाले बारामती तालुका अत्यावश्यक सेवांसह संपूर्ण लॉकडाऊन आहे. तरीही याठिकाणी आठवडे बाजारादिवशी व्यापारी रस्त्याच्या कडेला भाजी मंडई भरवतात. काल बुधवारी मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी सकाळी आठ वाजताच या मंडईत येऊन बाजारकरूंना हटकले. त्यामुळे निरेच्या मुख्य मंडाईत गर्दी झाली.
कोट
मनोज डेरे ग्रामसेवक
मागील महिनाभर दररोज सकाळच्य वेळेत भाजीमंडई भरते. प्रत्येक विक्रेत्यांकडून करपावती देऊन रक्कम घेतली जाते. मागील बुधवारपर्यंत दररोजचे मोजकेच व्यापरी मंडईत येत. आज मात्र अचानक मोठ्यासंख्येने व्यापरी आले.