शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

बाजारपेठा पडल्या ओस

By admin | Published: June 02, 2017 1:43 AM

शेतकरी संपाला गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांंनी एकमेकांना आव्हान करत बाजारात माल विक्रीसाठी

शेतकरी संपाला गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांंनी एकमेकांना आव्हान करत बाजारात माल विक्रीसाठी येऊ दिला नाही. व्यवहार रखडल्याने अनेक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरलेच नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर रोखत रस्त्यावर दूध ओतून दिले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तुरळक तणाव वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आंदोलन पार पडले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : तालुक्यात कुणाच्या कसल्याही आवाहनाशिवाय शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने राज्यव्यापी संपात सहभाग घेतला. या संपाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब व भुसार मालाच्या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे शेतमालाची आवकच झाली नाही.एकाच दिवसात बाजार समितीच्या उलाढालीत सुमारे चार कोटींची घट झाली. दूध संकलन न झाल्याने उपपदार्थ निर्मितीसाठी लागणाऱ्या सुमारे साडेपाच कोटी रुपयांची दूध खरेदी थांबली, असे सोनाई दूध संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. ‘लोकमत’शी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सचिव जीवन फडतरे यांनी सांगितले की, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील बाजार आवारात सोमवार व गुरुवार या दिवशी ज्वारी, मका व भुईमुगाच्या शेंगा आदी भुसार मालाची आवक होत असते. मंगळवार, गुरुवार व शनिवारी डाळिंब मार्केट सुरू असते. भुसार बाजारादिवशी सरासरी सहा ते सात हजार क्विंटल मालाची आवक होत असते. तर बारा ते तेरा हजार क्रेट डाळिंब येत असते. संपामुळे कसलीही आवक झाली नाही. परिणामी एकाच दिवसात भुसाराच्या उलाढालीत सुमारे दीड कोटी तर डाळिंब बाजारात अडीच कोटी रुपयांची घट आली आहे. सोनाई दूधचे संचालक विष्णूकुमार माने म्हणाले, संपाने ‘सोनाइर्’चे ९० ते ९५ टक्के दूध संकलन थांबले. आज सकाळी कळाशी, बावडा, हिंगणगाव, वरकुटे बुद्रुक या गावांत शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दिले. इंदापूर शहर परिसरात कसलाही अनुचित प्रकार घडल्याची ठाण्यात नोंद नाही.निमगाव केतकीसह परिसरातील शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा देत या राज्यव्यापी संपामध्ये आपला सहभाग नोंदवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी हा राज्यव्यापी संप होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ५० रुपयाप्रमाणे बाजारभाव मिळावा, अशा विविध शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी संपूर्ण राज्यभर १ जूनपासून राज्यव्यापी शेतकरी संपाचे आयोजन झाले आहे या शेतकरी संपाला इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीसह अन्य गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी निमगावमध्ये इंदापूर-बारामती राज्य महामार्गावर बस स्टॅण्डजवळ निमगावसह आजूबाजूच्या गावातील शेतकरी ग्रामस्थांनी रस्त्यावर डाळिंब, कांदा फेकून संपामध्ये सहभाग नोंदवला. सरकारविरोधात घोषणाबाजी व जाहीर निषेध करत राज्यव्यापी शेतकरी संपाला पाठिंबा दिला व संपात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या वेळी बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष बाबाजी भोंग, शेतकरी संघटनेचे हरी पवार, अ‍ॅड. श्रीकांत करे, गणेश शेळके, बाळासाहेब खराडे, सोमनाथ राऊत यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडापुरी (ता. इंदापूर) येथील प्रत्येक गुरुवारी भरणारा आठवडे बाजार आज पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शेतकरी संपामुळे भरला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसह नोकरदार लोकांचे हाल आज बाजार भरला नसल्याने झाल्याचे पाहावयास मिळत आहे.वडापुरी येथे प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे या बाजाराला काटी, रेडा रेडणी, अवसरी, वरकुटे, तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी, सुरवड, पंधारवाडी, राऊतवस्ती, राजगुरूवस्ती भागातील लोक बाजाराला येतात. परंतु, आज बाजाराला शेतकरी व व्यापारी आलेच नसल्याने सर्वसामान्य लोकांसह नोकरदारांचे या बंद बाजारामुळे भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू खरेदी करता न आल्याने मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहावयास मिळाले.संपूर्ण राज्यात आजपासून सुरु झालेल्या शेतकऱ्यांच्या संपाला बावडा (ता. इंदापूर) येथील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या वेळी आज गुरुवारी (दि. १) सकाळी बावडा-वालचंदनगर मार्गावर दुधाच्या किटल्या रस्त्यावर ओतून जोरदार निषेध नोंदविला.शेतमालाला योग्य भाव नाही, कर्जमाफी संदर्भात सरकारची उदासीनता, पाण्याअभावी शेतातील पिके जळाली तरी पाण्याचे नियोजन नाही अशा अनेक मागण्यांसंदर्भात बावडा येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. तसेच भाजप सरकाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांचे मालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,सहकारमहर्षी कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, धैर्यशील पाटील, किरण पाटील, विजय घोगरे, तुकाराम घोगरे, विद्यासागर घोगरे, संतोष सूर्यवंशी, अमोल घोगरे, अभिजित घोगरे, अंकुश घाडगे, किसन माने, युनुस मुलाणी, जालिंदर गायकवाड आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. शुक्रवारी (दि. २) बावडा येथील आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात आणू नये, ग्रामस्थांनी तो खरेदी करण्यासाठी बाजारात येऊ नये, असे आवाहन सर्व शेतकऱ्यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळावा व दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत आठवडे बाजार बंद करण्यात आला. सकाळी काही शेतकऱ्यांनी शेतमाल व्यापाऱ्यांना विक्री केला होता. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी नुकसानीचा विचार न करता बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.वालचंदनगर येथील बाजारपेठेत ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, बसपाचे हर्षवर्धन गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव बोन्द्रे, कुमार गायकवाड, बबलू पवार, सचिन गोसावी, महेश बोन्द्रे, प्रकाश साळुंके, शिवसेना तालुका प्रमुख योगेश कणसे, लखन साळुंखे, श्रीनिवास पाटील, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते़बारामती तालुका व्यसनमुक्त युवक संघ यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या संपाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. संघटनेचे तालुका अध्यक्ष भैया शिंदे व सचिव सचिन खलाटे यांनी माहिती दिली.आता शेतकरी शेतमाल व दूध यासारखा जीवनावश्यक माल बाजारपेठेत जाणार नाही यासाठी संप करत आहे. येणाऱ्या काळात शहरी व निमशहरी भागातील अनेक लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत. मात्र सरकारला या शेतकऱ्याविषयी जाणीव होणे गरजेचे आहे. आज शेतकरी अडचणीत असताना त्यातून मार्ग निघणे गरजेचे असताना फक्त चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारला या संपामधून नक्कीच जाग आल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक बाबतीत शासन मोठा खर्च करत आहे. मात्र शेतकरी आहे म्हणून दुर्लक्ष केले जाते. शेतकरी जरी संप करणार असला तरी आपले नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी शेतमाल रस्त्यावर फेकून न देता स्वत:च्या शेतात खत म्हणून माल जनावरांसाठी वापरावा. दूध असेल तर त्याचा खवा बनवावा, असे आवाहन केले.शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्सुफळ येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कोणत्याही प्रकारचा माल हा विकायचा नाही हा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने दूध, फळभाज्या, तरकारी, अंडी अशा अनेक प्रकारची जी काही शेतामध्ये पिकणारा माल तो विकायचा नाही असा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून सकाळी आपले दूध डेअरीला न घालता ते रस्त्यावर ओतून आंदोलन केले. या शेतकरी आंदोलनाला संपूर्ण गावाने पाठींबा दिला आहे.