पुणे : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मार्केटयार्डातील घाऊक फळभाजी बाजार बुधवारी बंद ठेवण्यात आला. मार्केट यार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. मार्केट यार्डसह, फुल बाजार तसेच मध्यभागताील महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी बंद पाळला.
यावेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मार्केटयार्डातील घाऊक फळ, पालेभाजी बाजार, तसेच फूल बाजारातील अडते मोठ्या संख्येने सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली. मार्केट यार्डासह मध्यभागातील महात्मा फुले मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. एरवी गजबजलेल्या मार्केट यार्ड, मंडई परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वीच बाजार घटकांतील व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीला बंदबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी शेतीमालाची आवक झाली नाही. त्यामुळे बंदला शेतकऱ्यांच्यासह व्यापारी बंद मध्ये सहभागी होत पाठिंबा दिला.
नियमानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करता येत नसल्याने फळबाजार व भुसार बाजार सुरू ठेवण्यात आला होता. तर शेतकरी यांनी स्वतः विक्री केली. फळ भाज्यांची 14 गाड्या आल्या.आडते, व्यापारी, कामगार यांनी मात्र बंद पुकारला होता. मराठा आरक्षणाला शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला असल्याचे दिसत होते त्यामुळे आज गुलटेकडी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचाही माल आला नाही. -दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती