पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातीलफळे व भाजीपाला व कांदा-बटाटा विभाग येत्या ३१ मेपासून सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी सर्व बाजार घटक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला मार्केट यार्डातील व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. मात्र,त्यासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांना अटी व नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. बाजार समितीने तयार केलेल्या नियोजनानुसार व बाजार समितीने दिलेल्या पर्यायानुसार संपूर्ण बाजारातील असलेल्या पाकळ्यांमध्ये एक बाजू एकादिवशी व दुसरी बाजू दुसऱ्यादिवशी अशा पद्धतीने फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील सर्व आडत्यांना कामकाज करावे लागणार आहे. येत्या रविवारपासून (दि.३१ मे) बुधवारपर्यंत (दि.३ जून) याचपद्धतीने कामकाज करावे लागेल. तसेच बुधवारी दुपारी बाजारसमिती व आडते असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेऊन या पद्धतीने व्यापार करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील कामकाजाची दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला जाईल,असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भूजबळ यांनी सांगितले.खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी बाजार समितीकडून परवाना घेतला नाही. त्यांनी त्वरित बाजार समितीकडे दोन दिवसाच्या आत त्यासाठी अर्ज करावा. आडत्यांसाठी केळी बाजार समोरील वाहनतळ व कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्या शेजारील वाहन तळामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने उभी करता येणार आहेत. सर्व आडत्यांनी आपल्या विभागातील गट प्रमुखांकडून स्वत:साठी त्याचप्रमाणे गाळ्यावरील मदतनीस व कामगार यांच्यासाठी ओळखपत्रे त्वरित करून घ्यावीत, असेही असे विलास भुजबळ यांनी सांगितले.
पुण्यातील मार्केटयार्ड रविवारपासून होणार सुरू; अटी व नियमावलीचे पालन करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 7:57 PM
खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय
ठळक मुद्देसर्व बाजार घटक व कृषी उत्पन्न बाजार समिती गुरूवारी बैठक