शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

मार्लापल्ले यांना वगळले

By admin | Published: September 24, 2015 2:08 AM

नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना नोकरीत लाभ देण्याबाबतच्या खटल्यात सरकारची बाजू मांडणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती

सुधीर लंके, पुणेनेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना नोकरीत लाभ देण्याबाबतच्या खटल्यात सरकारची बाजू मांडणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एच. मार्लापल्ले यांना सरकारी वकिलांनी खटल्याची कागदपत्रेच उपलब्ध करून देणे थांबविले आहे. तसा सरकारचा तोंडी आदेश असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपा सरकार मार्लापल्ले यांना खटल्यातून जाणीवपूर्वक वगळत असल्याची चर्चा आहे. ‘आशा बिडकर आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन’ असा हा खटला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा आदेश १९९१मध्ये काढला. १९९२मध्ये राज्यातही हा नियम लागू झाला. सुरुवातीला नेट-सेट उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने इतरांनाही तात्पुरत्या नियुक्त्या करण्याची सवलत देण्यात आली होती. राज्यात असे पाच हजारांहून अधिक प्राध्यापक आहेत. त्यातील काहींनी ‘यूजीसी’च्या एका आदेशाचा आधार घेत ‘आम्हाला नियुक्तीपासूनचे लाभ मिळावेत,’ यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने त्यांना लाभ देण्याचा आदेश २०१३ मध्ये दिला होता. राज्य शासनाने या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांना नियुक्तीपासूनचे वेतन द्यावयाचे ठरल्यास तीन हजार कोटींचा बोजा पडेल, असा प्राथमिक अंदाज आहे. नेट-सेट धारकांवरही तो अन्याय ठरेल. त्यामुळे २०१३ मध्ये विशेष बाब म्हणून मार्लापल्ले यांची नियुक्ती झाली. मार्लापल्ले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगितीही मिळविली. मात्र आता अचानक त्यांना या खटल्यासह उच्च शिक्षण विभागाच्या कुठल्याही खटल्याची कागदपत्रेच उपलब्ध करून दिली जात नाहीत. १ सप्टेंबरला त्यांच्याऐवजी सरकारी वकील कुणाल चिन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात खटल्याचे काम पाहिले. नेट-सेट प्रकरणात यापूर्वी प्राध्यापकांची बाजू मांडलेले अ‍ॅड. निशांत कटणेश्वरकर आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे मुख्य सरकारी वकील आहेत. मार्लापल्ले यांच्याबाबत राजकीय दृष्टिकोन ठेऊन उपरोक्त निर्णय घेण्यात आला, की सरकारला खटल्यात रस उरलेला नाही?, अशी शंका उपस्थित होत आहे.विधी व न्याय विभागाचे सचिव एन. जे. जमादार यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मला याबाबत काहीही माहिती नाही; माहिती घेऊन सांगतो,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.