शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या विवाहितेचा रेबीजने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:51 PM

पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी,नागरिकांसह १९ जणांना घेतला होता चावा

ठळक मुद्देबारामती शहरात खळबळ 

बारामती : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या विवाहितेचे सोमवारी(दि २५) सकाळी रेबीज ने मृत्यु झाला. या विवाहितेवर ससुन रुग्णालयात उपचार सुरु होते. रेबीजची बाधा झाल्याने खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिल्याने या विवाहितेवर ससुनमध्ये उपचार सुरु होते.मात्र,या उपचाराला यश आले नाही.दिपाली धनंजय जाधव (वय २७) असे या विवाहितेचे नाव आहे. त्या शहरातील देवतानगर परिसरात वास्तव्यास आहेत. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्या पतीसमवेत दुचाकीवर निघाल्या होत्या.यावेळी अचानक पाठीमागुन आलेल्या कुत्र्याने दिपाली यांना हाताला चावा घेतला. दिवाळीनंतर सुरु झालेल्या शाळेचा पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्याने विद्यार्थी,नागरिकांसह १९ जणांना चावा घेतला होता.  याच दिवशी दिपाली यांना देखील चावा घेतला होता.यानंतर त्यांनी उपचारापोटी त्यांनी दहा इंजेक्शन घेतली होती.मात्र, ते उपचार परीणामकारक ठरु शकले नाहित. काही दिवसांपुर्वी दिपाली यांना अचानक अस्वस्थ वाटु लागल्याने बारामती शहरातील खागसी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र,येथील खासगी डॉक्टरांनी दिपाली यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी हलविण्यास सांगितले.त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी(दि २४) पुणे शहरातील रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.मात्र,खासगी रुग्णालयात उपचार होणार नसल्याने त्यांना ससुनमध्ये नेण्याचा सल्ला पुण्यातील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी  दिला.त्याच दिवशी ससुन रुग्णालयात त्यांना दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले.मात्र,रेबीजचा आजार बळावल्याने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिपाली यांचा सोमवारी सकाळी  दुर्देवी मृत्यु झाला.त्यांच्या मागे पती धनंजय तसेच अडीच वर्षांची मुलगी आहे. कालच रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.———————————————

...चिमुकली तिच्या आईला अजाणत्या वयात मुकली नसतीदरम्यान,बारामतीमध्ये  अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कायम आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगर पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही कुत्री झुंडीने फिरतात. धष्टपुष्ट कुत्री पसरलेली असतात.या बाबत बारामतीकरांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरीषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतली आहे.हि मोहिम वेळीच हाती घेतली असती तर,एक चिमुकली तिच्या आईला अजाणत्या वयात मुकली नसती.—————————————————...अन्यथा रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भीती आहेयाबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ सदानंद काळे यांनी सांगितले की,पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यु झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. पिसाळलेले कुत्र चावल्याच्या पहिल्या दिवसापासुन दिलेल्या तारखांनुसार इंजेक्शन घेणे बंधनकारक आहे.तरच रेबीजपासुन सुटका मिळणे शक्य आहे. 0,३,७,१५,२८ तसेच ९० अशा क्रमनिहाय दिवसांनी रेबीजवर उपचार करण्यासाठी इंजेक्शन घेणे महत्वाचे आहे.शेवटचे इंजेक्शन या क्रमानुसार कुत्रे चावल्यापासुन ९० व्या दिवशी घ्यावयाचे आहे.वेळच्या वेळी इंजेक्शन घेणे महत्वाचे आहे.अन्यथा रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे. 

टॅग्स :Baramatiबारामतीdogकुत्रा