शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

हुंड्यासाठी छळातून विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: July 01, 2017 7:56 AM

माहेरच्यांनी लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, चारचाकी गाडी दिली नाही, एक लाख रुपयेच केवळ दिले असे वारंवार हिणवत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : माहेरच्यांनी लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही, चारचाकी गाडी दिली नाही, एक लाख रुपयेच केवळ दिले असे वारंवार हिणवत सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा, सासू आणि सासऱ्याविरूद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती महेश कुंडलिक डांगे (रा. नांदे ता. मुळशी), सासू कल्पना कुंडलिक डांगे आणि सासरे कुंडलिक डांगे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. विवाहितेचे वडील गिरीश नामदेव काटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा महेश डांगे याच्याशी ३० डिसेंबर २०१२मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतरही ती एका संस्थेत रात्रपाळीत एमबीएचे शिक्षण घेत होती आणि दिवसा नोकरी करीत होती. एक वर्षांनंतर सासरच्या मंडळींनी मध्यस्थामार्फत लग्नात व्यवस्थित मानपान केला नाही असे कळविले, तिच्या माहेरच्यांनी त्यांची जाऊन समजूत घातली. जुलै- आॅगस्ट २०१५ मध्ये ती सहा महिन्यांची गरोदर असताना नवऱ्याने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिला १६ जानेवारी २०१६ ला मुलगी झाली, या कारणासह तुझ्या माहेरच्या मंडळींनी चारचाकी गाडी दिली नाही ती आणल्याशिवाय नांदायला येऊ नकोस असे ते तिला सारखे म्हणायचे. बंगल्याच्या कामासाठी घरून तीन लाख रूपये घेऊन ये असे सांगून परत माहेरी धाडण्यात आले. तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांना १ लाख रुपये दिलेही, तरीही त्यांचे समाधान झाले नाही. अचानक २७ जूनला सायंकाळी पाच वाजता ती घरात पडली आहे असा दूरध्वनी सासरच्यांनी तिच्या आईवडिलांना केला. मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली.