लोकमत न्यूज नेटवर्क
बाभुळगाव : लग्नात आई वडीलांन भांडी दिली नाही, स्वयंपाक येत नाही अशा विविध कारणावरून विवाहतीचे रोज छळ सुरू असतांनाच हुंड्याचे १ लाख रूपये आण असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण केल्याची घटना शेटफळ हवेली येथे घडली. यात विवाहीता ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पतीसह सासु सासऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोनाली प्रविण चव्हाण (वय २०) सध्या (रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि.पूणे) यांनी पोलीसांत फिर्यात दिली आहे. त्यानुसार पती प्रविण दत्तु चव्हाण, सासु रेखा दत्तु चव्हाण, सासरे दत्तु अण्णा चव्हाण, दीर प्रदिप दत्तु चव्हाण, जाऊ रूतुजा प्रदिप चव्हाण या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी प्रविण दत्तु चव्हांण यांचे लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाले होते. मात्र, काही दिवसांनंतर विवाहीतेचा तीच्या सासरच्या मंडळीकडून हुंडा तसेच कीरकोळ कारणावरून वारंवार मानसिक व शारीरीक त्रास देण्यास सुरूवात केली. शुक्रवारी (दि २४) स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरुन तसेच मोहेरातून १ लाख रूपये हुंड्याचे आणावे यासाठी वरील पाच जणांनी फीर्यादीस जबर मारहाण केली. यात विवाहिता गंभीर जखमी झाली. पुढील तपास पोलिस हवालदार के. डी. शिंदे हे करत आहेत.