लोणी काळभोर : गेल्या तीन वर्षांपासून घरातील काम नीट करता येत नाही. तसेच माहेरकडून १० लाख रुपये आणावेत, या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडला. तिच्या तक्रारीनंतर पतीसह सासरा, सासू व एक महिला या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुजा नीलेश कांचन (वय २४, रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, सध्या रा. कुंजीरवाडी, धनश्री मंगल कार्यालयाशेजारी, ता. हवेली) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती नीलेश जयसिंग कांचन, सासरा जयसिंग बाबूराव कांचन, सासू नलिनी जयसिंग कांचन (तिघे रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन) व पतीची रखेल वीणा बाळासोा परदेशी (रा. उरुळी कांचन) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले. त्यानंतर पती रात्री-अपरात्री मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन तिला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ व मारहाण करू लागला. तिने मारहाणीचे कारण विचारले असता त्याने मी दुसरी बाई ठेवली आहे. तू मी सांगेन तसेच राहायचे, असे सांगितले. ही बाब तिने आई-वडिलांना फोनवरून सांगितली. परंतु सुधारणा होईल, या आशेने पोलीस ठाण्यात तक्रार न देता त्रास सहन करीत नांदत राहिली.त्यानंतर हॉटेल सुरू करायचे आहे, माहेरकडून १० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. हा प्रकार तिने वडिलांना सांगितल्यानंतर ते लग्नातील मध्यस्थांना समवेत घेऊन तिच्या घरी गेले. सर्वांना समजावून सांगितले. त्यानंतर तिचे वडील पूनमचंद यांनी स्वत:च्या नावावर असलेली जमीन विकली. जमीन विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी ४ लाख रुपये रोख व ६ लाख रुपये धनादेशाद्वारे असे एकूण १० लाख रुपये दिले. यानंतर सुख लाभेल, या आशेने अनुजा सासरी नांदत राहिली. परंतु तिच्या सासरी काहीच फरक पडला नाही. तिला शिवीगाळ, मारहाणीचा प्रकार सुरूच होता. नीलेश दुसºया महिलेला घरी घेऊन येऊन तिच्यासमवेत राहत असे व अनुजा हीस शिवीगाळ, दमदाटी करून तू या घरात राहावयाचे नाही, निघून जा असे म्हणत.३ एप्रिल २०१८ रोजी नीलेश रात्री दारू पिऊन घरी आला व नेहमीप्रमाणे अनुजा हीस शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर ४ एप्रिल रोजी पुन्हा तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. त्यानंतर पती व सासू-सासरे यांनी तिला घराच्याबाहेर काढून तू येथे राहायचे नाही, निघून जा, असे म्हणून तिला माहेरी पाठवून दिले.
दहा लाख देऊनही विवाहितेला दिले घरातून हाकलून, सासरच्या चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 7:48 PM
अनुजा व नीलेश यांचा विवाह १५ मे २०१५ रोजी झाला. लग्नासाठी अनुजा हिच्या वडिलांनी सुमारे २५ लाख रुपये खर्च केला. सुरुवातीला दोन ते तीन महिने तिला व्यवस्थित नांदविण्यात आले.
ठळक मुद्दे जमीन विक्रीतून आलेल्या पैशातून त्यांनी ४ लाख रुपये रोख व ६ लाख रुपये धनादेशाद्वारे असे एकूण १० लाख रुपये दिले.तोंडावर उशी दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न