शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘अभिजात’साठी 'मसाप'चा दिल्लीत आवाज; २७ फेब्रुवारीपूर्वी निर्णय घेण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:15 IST

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली.

ठळक मुद्देजय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला परिसर विषय मार्गी लागावा यासाठी साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता पण दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्याची सद्सद्विवेकबुद्धी केंद्र सरकारला मिळावी म्हणून शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ,पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, लेखक राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर यांच्यासह अनेक मराठी प्रेमी यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असतानाही देशातील सहा भाषांना अभिजातचा दर्जा देणारे केंद्र सरकार मराठीला हा दर्जा देण्यासाठी मात्र चालढकल करत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाखांहून अधिक पत्र पाठवली. सातत्याने पत्रव्यवहार केला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांशी संपर्क साधला. राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. अभिजात दर्जासाठी आता केवळ केंद्रीय मंत्री मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. मराठीला अभिजात चा दर्जा मिळणे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. २७ फेब्रुवारीपूर्वी (मराठी भाषादिनापूर्वी) अभिजातचा निर्णय जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या विषयासाठी एकत्र येणे जरुरीचे आहे.

दिल्लीत साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना अभिजातचा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्याला जावडेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदMilind Joshiमिलिंद जोशीNew Delhiनवी दिल्लीPuneपुणे