लोकमत व जय हरी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते-पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केर्इएम हॉस्पिटल व पूना हॉस्पिटलचे कन्सल्टंट डॉ. कल्याण गंगवाल, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, पुणे वनसंरक्षण अधिकारी रंगनाथ नाईकडे, शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी, महंत हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, शुभांगी कम्युनिकेशनचे संचालक पप्पूशेठ भळगट, जय हरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गव्हाणे आदींच्या अन्य संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.
'रक्तदान म्हणजे जीवदान' या भूमिकेतून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कौतुकास्पद उपक्रमात प्रत्येकाने स्वच्छेने सहभागी होऊन 'रक्तदान' करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
--
चौकट
रक्तदान शिबिराचे स्थळ : श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज मठ, चाकण चौक, आळंदी देवाची.
वेळ : सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत.
संपर्क : भानुदास पऱ्हाड ९७६३७७२८४४ / ९७६६१४१४४१. संतोष गव्हाणे : ९०४९ ७७९७९७.