बिबवेवाडी : बिबवेवाडी येथील पीएमटी कॉलनीमध्ये असलेले त्रिमूर्ती डेकोरेटर्सच्या मांडव गोदामाला दुपारी २.४५ मिनिटांनी भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या.
बिबवेवाडी येथील पोकळे वसाहत मध्ये पी एम टी कॉलनी तील त्रिमूर्ती डेकोरेटर यांच्या मांडव गोदामाला दुपारी २.४५ मिनिटांनी भीषण आग लागून गोदामातील लग्न समारंभ कार्यात लागणारे सजावटीचे साहित्य आगी मध्ये भस्म सात झाले.ही आग इतकी भीषण होती की बिबवेवाडी परिसरात दुरुन सुद्धा काळा धुराचे लोळ दिसत होते.मांडव गोदामाच्या लागूनच असलेल्या घरांमधील नागरीक घाबरून घराबाहेर पळाले परंतु येथील घरांचे मात्र या आगीमुळे मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कोंढवा, कात्रज व अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयातून अशा एकूण सात गाड्या, तीन देवदूत गाड्या व तीन पाण्याच्या टॅंकरच्या मदतीने आग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.
या आगीच्या भीषण दुर्घटनेत गोदामातील कापडी पडदे, खुर्च्या ,सोफे, सजावटीसाठी लागणारे लोखंडी साचे, प्लॅस्टिकची फुले असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागण्याचे कारण अजून ही अस्पष्ट असून पुढील तपास अग्निशामक दल प्रमुख प्रशांत रणपिसे करत आहे.गोदामाला लागलेल्या या भीषण आगीमुळे गोदामाला लागून असलेल्या आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची झळ इतकी प्रचंड होती की या घरांच्या भितीना तडा गेला असून गच्चीवरील पाण्याअ च्या टाक्या देखील वितळून गेल्या होत्या.................................................................................बिबवेवाडी येथील पोकळे वसाहती मध्ये अरुंद रस्त्यांचा व रस्त्यावरील पार्क केलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. त्यातच येथे मांडव गोदामाला आग लागल्यामुळे इथे अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोकळा रस्ता मिळतं नव्हता. त्यामुळे देखील येथे आग विजवण्याच्या कार्यात आड थळा निर्माण होत होता.