पुणे / बुलढाणा : पुण्यातील चंदननगरमधील आयआयएफएल गोल्ड लोनच्या दरोड्याप्रकरणी पुणेपोलिसांनी बुलढाण्यातून एका अधिकाऱ्याचा जावई असलेल्या दीपक विलास जाधव (३२) यास अटक केली असून, त्याच्याकडून आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. दरम्यान, या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार तोच असल्याचे चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, राजस्थानमधील मनीष यादव आणि श्याम नामक दोन आरोपींचा सध्या पुणे पोलीस शोध घेत आहे.पुणे पोलिसांनी बुलढाणा शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. दरम्यान, बुलणा येथून पथकाने एमएच २८-एएन- ५०५० क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरात आआयएफएल ही गोल्ड लोन कंपनी अर्थात इंडिया इन्फोलीन फायनान्स लिमिटेडमध्ये (आयआयएफएल) ५ डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल १२ किलो वजनाचे चार कोटी २० लाख रुपयांचे तारण ठेवलेले सोने बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले होते. जवळपास ३९४ पॅकेटमध्ये ते ठेवण्यात आलेले होते. पाच डिसेंबर रोजी बंदुकीच्या धाकावर या आआयएफएलमध्ये दरोडा टाकून हे सोने लुटण्यात आले होते.दरम्यान, त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, स्थानिक पातळीवर मिळालेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार याची खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी बारकाईने विश्लेषण करत चंदननगर पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी बुलढाणा गाठले होते. बुलढाणा शहरातील आरास ले आउटमधील एका व्यक्तीच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जात या पथकाने तेथून दीपक विलास जाधव (३२, रा. फ्लॅट नं. ६०९, ज्युबलेन बिल्डिंग, वाघोली, पुणे) यास अटक केली. बुलढाणा येथील कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा दीपक जाधव जावई आहे. दरम्यान, त्याचा एक नातेवाईकही संशयावरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तो वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची सध्या चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी उशिरापर्यंत चंदननगर पोलिसांनी येथे कारवाई करत दीपक जाधवकडून शौचालयात ठेवलेले आठ किलो ६०० ग्रॅम सोने जप्त केले असल्याची माहिती आहे. दरम्यान, पुणे येथील या पथकाने प्रकरणातील दुसऱ्या आरोपीसही औरंगाबाद हद्दीतून अटक केली असून सनी केवल कुमार (२९, रा. ८१२, सतरंजी चौक, लोणार गल्ली, पुणे) असे त्याचे नाव आहे, अशी माहिती एपीआय गजानन जाधव यांनी दिली. .........चारपैकी एक आरोपी राजस्थानातील४आयआयएफएल गोल्ड लोन दरोडा प्रकरणात पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून, मनीष यादव नामक आरोपी हा राजस्थानमधील रहिवासी असून, त्याचा एक श्याम नामक साथीदारही आहे. दीपक विलास जाधवने चौकशीत या दोघांची नावे सांगितली असून पुणे पोलीस सध्या त्यांच्या मागावर आहे. दरम्यान, प्रकरणातील चौथा आरोपी सनी केवल कुमार हाही पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे..............................
वाशिमच्याही एकाचीही चौकशीदीपक विलास जाधव याचा जवळचा नातेवाईक असलेल्या वाशिम येथील एकास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपासही चंदननगर पोलीस करत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मात्र त्यादृष्टीने काही निष्पन्न झाले नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एकाचीही पोलीस चौकशी करीत असल्याची माहिती आहे..............तीन कोटींचा मुद्देमाल जप्तया प्रकरणात पोलिसांनी अताापर्यंत ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात १२ किलो सोन्यापैकी आठ किलो ६०० ग्रॅम सोने, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार एमएच-२८-एएन-५०५० ही ताब्यात घेण्यात आली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच आम्ही हस्तगत करू, असे एपीआय गजानन जाधव यांनी बोलताना सांगितले. चंदनगर पोलीस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव, अजित धुमाळ, तुषार खराडे, तुषारा अल्हाट, चेतन गायकवाड, कृष्णा बुधवत, सुभाष आव्हाड यांनी बुलढाण्यात कारवाई केली. त्यांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी आणि बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या पथकास मदत केली.