Pune | पुण्यातील व्यावसायिकावर खुनी हल्ला; मारेकरी मध्य प्रदेशमधून जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:30 PM2023-01-12T20:30:25+5:302023-01-12T20:30:50+5:30
दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली...
नारायणगाव (पुणे) : निमगाव सावा येथील व्यावसायिक इक्बाल सरदार पटेल (वय ५१) यांच्यावर पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार करून पसार झालेले तीन आरोपींना नारायणगाव पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे (ग्रामीण) यांच्या पथकाने मध्य प्रदेश येथे ताब्यात घेतले. या आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. दरम्यान, दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
व्यावसायिक इक्बाल सरदार पटेल यांचेवर दि. ४ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी वार झाले. मुख्य सूत्रधार शाहरुख पटेल (रा. निमगावसावा, ता. जुन्नर) सह प्रकाश फिरंग्या पाडवी (वय २२, रा. केली, सिलावद ,जि. बडवाणी, मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिस पथकाने मध्य प्रदेश येथील केळी, सिलावद जिल्हा बडवानी तेथील स्थानिक पोलिस स्टेशनच्या मदतीच्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन एक विधी संघर्षीत बालक ताब्यात घेतले तसेच त्याने गुन्हा केल्याचे त्याचे पालकांचे समक्ष त्याने कबुली दिली. ही कामगिरी ही पोलिस हवालदार दीपक साबळे, पोलिस नाईक दिनेश साबळे, कॉन्स्टेबल सचिन कोबल, संतोष साळुंके, अक्षय नवले, शैलेश वाघमारे, संदीप वारे, संतोष कोकणे, आकाश खंडे या पथकाने केली आहे.