लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा खून करण्यात आला होता. सदर खून मयत गायकवाड यांच्या चुलत भावाने सुपारी देऊन घडवून आणला असल्याचे उघड झाल्यानंतर, याप्रकरणाचा मास्टरमाइंड पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड (रा. वडकी, तळेवाडी) यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पोलीस पथकाने २८ डिसेंबर रोजी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मेघराज विलास वाहळे (वय २३ रा, भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर, साइबाबा मंदिरासमोर,पुणे, मूळ वरवडे, ता. आंबेगाव), दत्तात्रय महादेव पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना या अगोदर अटक करण्यात आली असून, ते लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात आहेत. न्यायालयाने त्यांना ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.वरील तिघांना पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य सूत्रधार पप्पू उर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड फरार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पोलीस पथकाने वडकी, शिरूर, सासवड, कात्रज, सातारा रोड याभागात वेशांतर करून त्याची शोधमोहीम सुरू केली. पोलीस हवालदार महेश गायकवाड व नीलेश कदम यांना पप्पू गायकवाड हा २८ डिसेंबर रोजी हंडेवाडी चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. याआधारे हे विशेष पोलीस पथक वेशांतर करून सापळा रचून उभे होते. दरम्यान पप्पू गायकवाड हा तोंडाला रूमाल बांधून हंडेवाडी चौकात येत असलेला दिसला. पुढे पोलीस आहेत हे त्याचे निदर्शनास आल्याने तो पळून जाऊ लागला. परंतू पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.पप्पू गायकवाड यास पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (वार्ताहर)पप्पू चव्हाण याचा केला होता खून या खूनप्रकरणी यापूर्वी अटक केलेला व पोलीस कोठडी रिमांडमध्ये असलेला मेघराज वहाळे व त्याच्या साथीदारांनी सन २०१३ मध्ये पौड पोलीस ठाण्याचे हद्दीतील कासार अंबोली (ता. मुळशी) येथे कुख्यात गुंड गणेश मारणे टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू चव्हाण याचा निर्घृणपणे खून केला होता. सदर गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आहे. कोर्टात केस चालू असल्याने त्याचे वारंवार कोर्टात येणे असल्याने त्याची पप्पू गायकवाड याच्याशी ओळख झाली होती.
‘मास्टरमार्इंड’ही अखेर गजाआड
By admin | Published: December 30, 2016 4:29 AM