मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 07:18 PM2020-09-30T19:18:03+5:302020-09-30T19:19:25+5:30

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे...

The Matang community will fight for the demands in the all state : Ramesh Bagave | मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे 

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे 

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. समाजाच्या अन्य मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यभर लढा उभारणार असल्याचे माजी गृहराज्य मंत्री आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. 

स्वतंत्र आरक्षण, क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू करणे, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे महामंळाचे कर्ज माफ करणे, महामंडळाची तत्काळ पुनर्रचना करून महामंडळ सुरू करावे, बार्टीच्या धर्तीवर आर्ट्टीची स्थापना करावी, संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक लवकरात लवकर सुरू करावे, आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, चिरानगर येथील आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे, कै. संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना मदत करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, अनिल हतागले, रमेश सकट, सुरेश अवचिते, अरुण गायकवाड, राजू गायकवाड, सुनील बावकर, हुसेन शेख, त्रिंबक अवचीते, विशाल कसबे, नारायण पाटोळे, रावसाहेब खवले, मारुती कसबे यांच्यासह कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Web Title: The Matang community will fight for the demands in the all state : Ramesh Bagave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.