पुणे : राज्य शासन संचलित क्रीडा प्रबोधिनीच्या ज्युदोपटूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली.नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी (पुणे-अमरावती) ज्युदोपटूंनी एकूण १३ पदकेजिंकून उपविजेतेपद संपादन केले. मुंबई संघाने विजेतेपदआपल्या नावावर केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्तखेळाडूंची १७ ते २१ जानेवारी जालंधर (पंजाब) येथे होणाºयाकॅडेट व ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.क्रीडा प्रबोधिनी पदकविजेते खेळाडू असे : कॅडेट वयोगट १५ ते १८ वर्षांखालील : * रोहिणी मोहिते : ४० किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी अमरावती) हिने सांगलीच्या ऐश्वर्या शेळके, अमरावतीच्या ऋतिका ढगे व फायनलमध्ये नागपूरच्या कल्याणी राऊतचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.* राणी खोमणे : ४४ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ठाणेच्या प्रेरणा, नाशिकची गायत्री, कोल्हापूरची दिव्या व फायनल बाऊटमध्ये रागिनी मोहिते हिचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.* महिमा गाडीलोहार : ४८ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ठाण्याच्या प्रेक्षा शहा, प्राजक्ता पाटील (सांगली) व फायनलमध्ये श्वेता मोरे (अमरावती) यांचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.* स्नेहा खवरे : ५२ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने सलोनी वºहाडकर (रत्नागिरी),प्रियांका डोंगरे अमरावती व फायनल बाऊटमध्ये नूपुर चव्हाण कोल्हापूर हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले.* काजल औताडे : ६३ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने साक्षी रासकर (सातारा)प्रांजल पुराणिक (ठाणे) व फायनलमध्ये मुंबईची राधिकाजेठवा हिचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.हे सर्व खेळाडू पुणे येथीलक्रीडा प्रबोधिनीत मार्गदर्शिकामधुश्री काशीद (देसाई) आणि अमरावती येथे मार्गदर्शक सतीश पहाडे यांच्या मार्गदर्शनाखालीसराव करतात.ज्युनिअर वयोगट १८ ते २१ वर्षांखालील* ४० किलो : साक्षी देशमुख : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने आॅल टू आॅल प्ले सिस्टीममध्ये ज्योती हेगडे (कोल्हापूर), सोनाली गोराळे (नाशिक), जिन्नत पठाण (गोंदिया), अनुश्री बहेकर (अमरावती) यांचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. * धनश्री वाडकर :४४ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने श्रद्धा गिरी (कोल्हापूर), हर्षा चौधरी (नाशिक) यांचा पराभव केला व फायनल बाऊटमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये नमिता नरसाळे (अ. नगर) हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. * कोमल मोकाशी : ४८ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने ज्योती चटसे हिचा पराभव केला व सेमी फायनलमध्ये नाशिकच्या विद्या लोहार हिच्यासोबत खेळताना पराभव पत्करावा लागला व कांस्यपदकावर समाधान प्राप्त करावे लागले. * पूजा उरकुडे : ५२ किलो : रौप्य (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती) हिने पायल हुशारे (अमरावती) ऋतुजा वैद्य (जळगाव), रसिका सांगळे (पीडीजेए) यांचा पराभव केला व सोनाली मगदूम (कोल्हापूर) हिच्यासोबत फायनल बाऊटमध्ये खेळताना पराभव पत्करावा लागला व रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.* माधुरी घेरडे : ५७ किलो : सुवर्ण (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने कोमल सिद (पीजेए), गौरी पाटील (कोल्हापूर) व फायनलमध्ये शुभांगी राऊत (नागपूर) हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त* त्वनीन तांबोळी : ७० किलो : (क्रीडा प्रबोधिनी, पुणे) हिने सृष्टी जीना (मुंबई) व आरती टकले हिचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. * प्रज्वल तळोकर (मुले) : ८१ किलो : कांस्य (क्रीडा प्रबोधिनी, अमरावती)
केपीच्या ज्युदोपटूंची पदकांची लयलूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:45 AM