पश्चिम भागात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात भोरगिरी, भिवेगाव या परिसरात सुमारे १०० घरांचे नुकसान झाले. याचे प्रशासनाने पंचनामे तयार केले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांची आमदार दिलीप मोहिते पाटील,
जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या उपस्थितीत पश्चिम भागातील झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या आवाहननुसार खेड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून १०० पत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले, तत्काळ झालेल्या मदतीमुळे भोरगिरी व भिवेगाव येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच पत्र्यांचे वितरण मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे मा. सभापती अरुण चांभारे, बाळ ठाकूर, उपसभापती सुरेश शिंदे, विठ्ठल वनघरे, किरण वाळुंज, उमेश कुंभार, संदीप शेलार व ग्रामस्थ उपस्थित होते.
२० राजगुरुनगर मदत
नुकसानग्रस्तांना घरांसाठी पत्रे देताना दिलीप मोहिते- पाटील व इतर.