शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

पुण्यातील हौशी कार्यकर्त्यांचे मोहोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 2:34 AM

वारजेतील रुणवाल पॅनोरमा : नव्या व्यवस्थापन समितीची विविध उपक्रमांची सुरुवात

पुणे : वारजे परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेली नागरी शिस्तीचा आदर्श घालून देणारी सोसायटी म्हणजे रुणवाल पॅनोरमा सोसायटी होय. सोसायटीची स्थापन २००१ मध्ये करण्यात आली. सोसायटी अंतर्गत ११४ सदनिका आहेत. सोसायटीच्या नव्या व्यवस्थापकीय समितीच्या मार्गदर्शनातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीत राजेंद्र ढमाले (अध्यक्ष), सचिन लोखंडे (सचिव), किरण ढोमसे (खजिनदार), सत्तार पटवे, सुरेश नागपुरे आदी सभासदांचा सहभाग आहे.सांस्कृतिकसोसायटीमध्ये वर्षभर सर्व सण उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव, होळी, दहीहंडी, दिवाळीतील दीपोत्सव इत्यादी उत्सव साजरे केले जातात. सण-समारंभाच्या निमित्ताने सभासदांचे एकत्रीकरण घडून येते. या दरम्यान तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व सभासद आनंदाने सहभागी होतात.

सुरक्षा

सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या पुढाकारातून परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे सभासदांच्या मालमत्तेच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. अनोळखी व्यक्तींच्या हालचाली टिपता येतात. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांचीही परिसरात करडी नजर असते.पाणीसभासदांकडून पालिकेकडून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यात येते. सोसायटीच्या परिसरात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता सोसायटीतील सभासद घेत असतात. सोसायटीत एक कूपनलिका आहे. कूपनलिकेच्या पाण्याचा वापर सोसायटीतील वृक्ष रोपांच्या संवर्धनासाठी तसेच इतर कामासाठी करण्यात येतो.कचराशहरातील लोकसंख्या पाहता प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीने कचºयाचे व्यवस्थापन करने क्रमप्राप्त ठरते. त्यामुळेच सोसायटीतील सभासद परिसरात कुठेही कचरा होणार नाही. याची दक्षता घेतात. त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो. सर्व सभासद ओल्या आणि सुक्या कचºयाचे व्यवस्थित वर्गीकरण करुन स्वच्छता कर्मचाºयांकडे देतात.वृक्षारोपण४सोसायटीच्या आवारात फणस, कडुनिंब, पारिजातक, वड अशी आपल्या हवामानाला पूरक अशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे सोसायटीतील हवा शुद्ध राहते. सभासदांकडून परिसरातील वृक्ष-रोपांची निगा राखली जाते.सामाजिकसोसायटी पुणे-बंगळुरू महामार्गाजवळच असल्याने महामार्गावरील अपात्कालीन परिस्थितीत, तसेच अपघातावेळी सभासद धावून जातात व अपघातग्रस्तांना मदत करतात.सोसायटीतील अनेक सभासद वैयक्तिक पातळीवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. सोसायटीतील उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी, तसेच इतर कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभत असते.वीजबचतव्यवस्थापकीय समितीने सोसायटीच्या सामाईक परिसरातील जुन्यादिव्यांचा वापर थांबवून एलईडी दिवे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वीजबचत होत आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिक