शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

मंचरला महामार्गाने घेतला मोकळा श्वास, : ३५० अडथळे हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 3:00 AM

पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

मंचर - पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या मंचर शहरातील ३५० अतिक्रमणांवर बुधवारी हातोडा पडला. जेसीबी व गॅसकटरच्या साह्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पहाटे साडेपाचला सुरू झालेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. प्रवाशांनी व वाहनचालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.अतिक्रमणाविरोधी सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मंचर ग्रामपंचायत, प्रांताधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग विभागाने सयुक्तपणे मोहीम राबविली.पुणे-नाशिक महामार्ग मंचर शहरातून गेला आहे. महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती. त्याचा अडथळा वाहनांना प्रवास करताना होत होता. स्थायी व अस्थायी फ्लेक्स बोर्डांमुळे रस्त्याचे विद्रुपीकरण झाले होते. अपघात होऊ लागले होते. प्रशासनाने ३५० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमण काढून घेण्यास सांगण्यात आले होते. काही व्यावसायिकांनी ते काढून घेतले होते.नंदकुमार पेट्रोल पंप तेजीवन हॉटेलपर्यंत असणाºया अतिक्रमणधारकांना नोटिसा गेल्या होत्या. विशेष म्हणजे महामार्गालगत इमारत बांधताना त्या योग्य अंतर राखून बांधण्यात आल्याने अतिक्रमणात आल्या नाहीत.पहाटे साडेपाच वाजता नंदकुमार पेट्रोल पंपापासून कारवाईला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे व फलक काढून टाकण्यात आले. सरपंच दत्ता गांजाळे यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.दोन जेसीबी व तीन ट्रॅक्टरच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. दोन गॅस कटरच्या साह्याने फलक कापून काढून ते लगेच बाहेर पाठविण्यात आले. ग्रामपंचायतीचे ५० कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. सरपंच गांजाळे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रकाश धस, फौजदार बंडोपत घाटगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. १० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.प्रांताधिकारी अजित देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस,राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथॉरिटीचे अनिलकुमार मिश्रा यांनी कारवाई सुरू झाल्यानंतर भेट दिली. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. अतिक्रमणाच्या कारवाईला कोणीही विरोध केला नाही. एसटी बसस्थानकातील मोठे फलक जेसीबीच्या साह्याने काढण्यातआले आहे.मोरडेवाडी रस्ता येथील भिंत पाडण्यात आली. सायंकाळपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू होती. उपसरपंच महेश थोरात, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कारवाईच्या वेळी हजर होते.बसस्थानकाने घेतला मोकळा श्वासमंचर एसटी बसस्थानकात सर्वाधिक अतिक्रमण झाले होते. पुणे-नाशिक महामार्गालगत असणाºया भिंतीलगत ओळीने टपºया उभ्या होत्या. प्रवेशद्वारावरदुतर्फा फळविक्रेते बसलेले होते. आतील आवारात छोट्या-मोठ्या फलकांनी जागा व्यापली होती. ही सर्वच अतिक्रमणे आज काढण्यात आल्याने बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. बसस्थानकालगतच्या टपºया रातोरात निघाल्या. ती जागा सकाळीच रिकामी झाली होती. मोठे फ्लेक्स व लोखंडी फलक जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आली. बसस्थानकाचा आवार रिकामा झाला असून दूरवरून बसस्थानकातील एसटी बस दिसू लागल्या आहेत.महामार्गावरील अतिक्रमणे काढण्याची मंचर शहरातील ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईचे वाहनचालक व प्रवाशांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतीच्या धडक कारवाईबाबत अनेक जण समाधान व्यक्त करत होते. विशेष म्हणजे अतिक्रमण काढताना कुठलाही विरोध झाला नाही. मंचर एसटी बसस्थानकासमोर पोलीस मदत केंद्र आहे. हे केंद्र अतिक्रमणात येत असल्याने ते काढण्याची कारवाई सुरू झाली होती. अतिक्रमण काढताना कोणालाही सूट देण्यात आली नाही.दुसरा टप्पा मंचर-घोडेगाव रस्ता४दरम्यान,पुणे-नाशिक महामार्गालगतची अतिक्रमणे काढली आहेत. आतामंचर-घोडेगाव रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली जाणार आहेत.४नोटिसा संबंधितांना पाठविण्यात आाल्या आहेत. अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरnewsबातम्या