शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
3
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
4
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
5
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
6
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
7
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
8
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
9
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
10
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
11
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
12
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
13
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
14
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
15
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
16
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
17
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
18
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
20
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"

Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:05 AM

Ashadhi Wari- पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल

आळंदी: यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आषाढी पायीवारीसाठी (Ashadhi Wari) उद्या (दि. २९) आळंदीतूनपंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर अलंकापुरीत वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आज (दि.२८) देहूनगरीतून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने अनेक वारकरी आळंदीतून देहूकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान अलंकापुरीही माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.

आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल होत असते. गुरुवारी (दि.२७) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले आहेत. परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून निघाली आहे. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत.सद्यस्थितीत दर्शनरांग इंद्रायणी पलीकडे जाऊन पोहचली आहे. मात्र अनेक जण थेट मंदिरातून मुखदर्शनाचा लाभ घेत आहेत.                  वाढती गर्दी लक्षात घेऊन आजपासून (दि.२८) महाद्वारातून वारकरी तसेच भाविकांना प्रवेश बंद केला जाणार आहे. दरम्यान टेम्पो, ट्रकमधून वारकरी भाविकांचे आगमन होत आहेत. तर काही वारकरी पायी चालत आळंदीत दाखल होत आहेत. भविकांच्या आगमनाने इंद्रायणी नदी तीर गजबजून निघाला आहे. इंद्रायणी तीरावर वासुदेवाच्या हरीनामाचा गजर ऐकू येत आहे. तर काही भाविक वारीची आठवण जतन करण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावर आपल्या कुटंबियांसमवेत मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना दिसून येत होते.               पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार प्रसाद फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजलेली दिसून येत आहेत. मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक 'ज्ञानोबा माऊलीचा' जयघोष करत आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरामध्ये क्षणभर विसवून हरीनामाचा जप करताना दिसत आहेत. भाविकांना आता माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची आतुरता लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpurपंढरपूर