मावळ लोकसभा निकाल २०१९ : मावळमध्ये राष्ट्रवादीची धाकधुक वाढली. पार्थ पवार मोठ्या पिछाडीवर..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:40 AM2019-05-23T10:40:17+5:302019-05-23T11:01:09+5:30
maval loksabha results 2019 after 4 round : पहिल्या फेरीपासून सुरु असलेली पिछाडी भरून काढण्यात पार्थ पवार यांना आतापर्यंत यश मिळालेले नाही
मावळ : पिंपरी : शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत पार्थ पवार यांच्यासह राष्ट्रवादीची धाकधूक वाढवली होती.. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मावळमध्ये चौथ्या फेरीनंतर शिवसेनेचे श्रीरंग बारणे .६८,३१९ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २, २९,३२१ मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात .१६१००२ मते मिळाली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९पासून झाली. तेव्हापासून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदारसंघात हा परिसर विभागला होता. मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघ शिवसेनेनं वरचष्मा राखला आहे. या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक मानली जाणारी ही लढत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले आहे.
गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 60.11 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना 5 लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती.
-----------------