आज मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना प्रचाराबाबत सूचना दिल्या. मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. आपण पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आपल्या विरोधातील उमेदवाराचे आणि आपले गेल्या अनेक वर्षापासून संबंध आहेत. पण, संबंधाचा गैरअर्थ सुरू आहे. माझी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, निवडणुका होईपर्यंत कोणीही भेटायला जाऊ नका", अशी तंबी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
भूताच्या शोधात अख्खी रात्रच स्मशानात! महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम
"प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म आपण पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार म्हणाले, विरोधी उमेदवार कदाचित असं सांगेल की, अजितदादांनी मला उभं रहायला सांगितलं आहे, असं अजिबात नाही. अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, भूलथापांना बळी पडू नका, असंही पवार म्हणाले.
अजितदादांचा विरोधकांना टोला
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निर्णय घेण्याची क्षमता जनतेन बघितली आहे. त्यासाठी आपण मोदींना ताकद द्यायची आहे, पिंपरी चिंडवड यात कमी पडता कामा नये, असंही पवार म्हणाले. संविधान बदलण्याच काम कोणीही केलेले नाही. १० वर्षात कुठंही संविधान बदलण्याचे काम झालेलं नाही. विरोधक म्हणतात, यापुढं निवडणुका होणार नाहीत हे सगळं खोट आहे, विरोधक वाटेल ते बोलत आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.