पुणे :मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड आणि लोकसंख्येने मोठा मानला जाणारा मावळ मतदारसंघ कायमच अवघड मानला जातो. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून बारणे यांनी आघाडी घेत ती टिकवली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाची निर्मिती २००९ पासून झाली.त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदार संघात हा परिसर विभागला होता. मतदार संघ निर्मितीनंतर झालेल्या दोनही लोकसभा मतदार संघ मावळ शिवसेनेकडे आहेतेव्हापासून झालेल्या दोन निवडणूकींमध्ये हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. सुरुवातीला गजानन बाबर आणि २०१४साली बारणे हेच तिथे विद्यमान खासदार होते. त्यानंतर राष्ट्रवादीने पार्थ यांना उमेदवारी दिल्याने लढत प्रतिष्ठेची बनली होती. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना एक लाख आठ हजार १६० मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ३ लाख ४७ हजार ५४८ मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात मते २ लाख ३९ हजार ३८८ मिळाली आहेत.मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या मतदार संघात ६०.११ टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना ५ लाख १२ हजार २२६ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना ३ लाख ५४ हजार ८२९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती.