शहरं
Join us  
Trending Stories
1
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
2
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
3
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
4
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
5
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
6
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
7
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
8
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
9
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
10
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
11
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
12
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
13
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
14
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
15
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
16
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
17
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा
18
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
19
एकनाथ शिंदे ते पृथ्वीराज चव्हाण: प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात किती झाले मतदान?
20
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर

Maval Vidhan Sabha 2024 : कारभाऱ्याच्या निवडीसाठी शहरी-ग्रामीण मतदारांची गर्दी

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 21, 2024 12:54 PM

मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत

पिंपरी :मावळ मतदारसंघात मतदान करवून घेण्यासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव, लोणावळा या शहरी भागातून सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान झाले, तर दुपारनंतर ग्रामीण भागातील केंद्रांवर गर्दी होती. प्रमुख उमेदवारांनी सकाळीच मतदान करत केंद्रांना भेट दिली.मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडून सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. मतदारसंघाचा बहुतांश भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगरदऱ्यांचा दुर्गम आहे. तरीही शहरातील मतदारांच्या तुलनेत हा मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. सायंकाळी पाचपर्यंत मावळमध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते.नऊनंतर मतदार केंद्रावर रांगासकाळी ७ वाजल्यापासून मतदार येत होते. त्यातही तरुणांचा समावेश जास्त होता. मात्र, नऊनंतर केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उमेदवारांच्या स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची मतदारांना आणण्याची लगबग सुरू होती.दुपारनंतर शुकशुकाटशहरी भागात सकाळी मतदान उत्साहात सुरू झाले. मात्र, दुपारी तीननंतर शुकशुकाट होता. काही मतदान केंद्रांवरील कार्यकर्ते मतदारांपैकी कोणी राहिले आहे का? याची चाचपणी करत मतदारांना शोधून आणून मतदान करायला लावत होते.मतदान केंद्राबाबत गोंधळकाही केंद्रांवर मतदारांची नावे याद्यांमध्ये नसल्याच्या किंवा मतदान केंद्र बदलल्याच्या तक्रारींमुळे मतदारांसह कार्यकर्त्यांची, अधिकाऱ्यांची गडबड उडत होती. तुरळक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत होते. पवन मावळ, आंदर मावळमधील ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. वयोवृद्ध तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था प्रशासनाने केली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Puneपुणेmaval-acमावळ