शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल

By राजू इनामदार | Published: December 11, 2024 8:44 PM

सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होणार आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणूक निकालाविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होणार आहे. काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनुसिंघवी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जिल्ह्यातील मविआचे पराभूत उमेदवार व सिंघवी यांच्यात मंगळवारी रात्री चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे हडपसर विधानसभेचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व संगमनेर विधानसभेतील पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात व जिल्ह्यातील मविआचे सगळे पराभूत उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.सिंघवी यांनी सर्वांचे मुद्दे ऐकून घेतले. ईव्हीएमबद्दलच्या आक्षेपांवर त्यांनी विस्ताराने चर्चा केली. आयोगाने सांगितलेले सर्व शुल्क जमा केल्यानंतरही विशिष्ट संख्येतील यंत्रांमधील व्हीव्हीपॅट मोजले जातील व अन्य नियमच वारंवार सांगितले जातात, आकडेवारीतील तफावत, टक्केवारीत एका रात्रीत झालेला बदल वगैरे गोष्टींबाबत ते कसलाही खुलासा करायला तयार नाहीत, असे सिंघवी यांना सांगण्यात आले. त्यानंतर सिंघवी यांनी कोणत्या मुद्द्यांवर याचिका दाखल करता येईल याविषयी सांगितले. त्यासंबंधीची कागदपत्रे तयार करून शुक्रवारी किंवा सोमवारी याचिका दाखल करू, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMahayutiमहायुती