पुण्यात सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेल्या भागात सध्या एकही जम्बो कोविड रुग्णालय नसल्यामुळे अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण हडपसर भागात सध्या कोविड विषाणूमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हडपसर भागात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोविड झालेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन बेड मिळत नाही, रेमडेसिविर इंजेक्शनही मिळत नाही. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम हडपसरमध्ये अनेक रुग्ण दगावत आहे. हडपसरमधील तरुण मुकेश वाडकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पुणे मनपा आयुक्त, सौरभ राव व पुणे मनपा महापौर मुरलीधर मोहोळ यांना थेट ई-मेल करुन आपली मागणी केली आहे .
त्यासाठी आपले सरकार महाराष्ट्र राज्य पोर्टलवर जाऊन तशी तक्रार ही केली आहे. हडपसरकरांची ही मागणी लवकर पूर्ण करतील, अशी आशा मुकेश वाडकर यांनी व्यक्त केली.