पिंपरी : मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेकडे स्वाभिमान शिल्लक असेल, तर राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडावे. भाजपाने अच्छे दिनाचे गाजर दाखवून नोटाबंदी केली. त्याचा परिणामामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. आरबीआय ही भाजपा आणि आरएसएसची शाखा असल्याचे वाटते, अशी टीका प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाकड येथे केली.प्रभाग क्र. २६ मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप यांच्या प्रचारासाठी पिंपळे निलख, विशालनगर येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी खासदार हुसेन दलवाई, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, प्रचारप्रमुख व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी महापौर कवीचंद भाट, सेवादल शहराध्यक्ष संग्राम तावडे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, राजेंद्रसिंग वालिया, शहाबुद्दीन शेख, विष्णू नेवाळे, श्याम अगरवाल, नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, लक्ष्मण रुपनर, अनंत कुंभार, संकेत जगताप, सुनील साठे, काळुशेठ नांदगुडे, कुमार नांदगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय जगताप, नंदकिशोर रणदिवे, नागेश जाधव, योगेश पासलकर, नीलेश जगताप, सुरेश गायकवाड, बाळासाहेब जगताप, सुधीर वसंत साठे, शैलेश कर्नावट, सनी शिंदे, विशाल जगताप, अरुण नांदगुडे, बाळासाहेब कस्पटे, संदेश जयसिंग भोसले, अशोक मेंगळे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘‘परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख भरण्याचे आश्वासन दिले. काय झाले? मोदींनी वैयक्तिक हट्टापायी नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांवर लादला. काळा पैसा आला तर नाहीच, मात्र दोनशे नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही आर्थिक मंदी आहे.नैतिकतेचा टेंभा मिरवणारे गुंडांना पक्ष प्रवेश देऊन त्यांना सुधारण्याची संधी दिली अशी भाषा केली जाते. स्वर्गीय अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या विचाराने शहराचा विकास झाला. विकासाची फळे चाखून, काहीजण दुसऱ्या पक्षात गेले. पिंपरीचा महापौर कॉँग्रेसच ठरवेल. (प्रतिनिधी)
काँग्रेसच ठरविणार महापौर : अशोक चव्हाण
By admin | Published: February 18, 2017 3:08 AM