शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे

By admin | Published: March 09, 2017 4:24 AM

महापालिकेमध्ये ९८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपाकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे

पुणे : महापालिकेमध्ये ९८ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविलेल्या भाजपाकडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक, तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) नवनाथ कांबळे यांनी आज (बुधवारी) दुपारी नगरसचिव कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या १५ मार्च रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असली, तरी आता या निवडीची केवळ औपचारिकता उरलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत पार पडणार आहे.महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून लता राजगुरू यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून महापौरपदासाठी संगीता ठोसर यांनी व उपमहापौरपदासाठी विशाल धनवडे यांनी अर्ज भरला.भाजपाकडून मुक्ता टिळक यांनी दाखल केलेल्या महापौरपदाच्या अर्जावर सूचक म्हणून सुनील कांबळे, मंगला मंत्री, योगशे मुळीक, धीरज घाटे यांनी व अनुमोदक म्हणून शंकर पवार, महेश वाबळे, दिलीप वेडे-पाटील, मंजूषा नागपुरे यांनी सह्या केल्या. रिपाइंचे नवनाथ कांबळे यांच्या अर्जावर सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, मानसी देशपांडे यांनी सूचक म्हणून व नीलमा खाडे, सोनाली लांडगे, फरजाना शेख यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या.निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर मतदान होऊन भाजपा उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया पार पडेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली आहे. पुण्यात मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस हे आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.टिळक वाड्याला महापौरपदाचा मान : लोकमान्य टिळकांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या टिळक वाड्याला मुक्ता टिळक यांच्या निमित्ताने महापौरपदाचा मान मिळणार आहे. टिळक यांचे मार्केटिंगमध्ये एमबीए झालेले आहे. त्याचबरोबर पत्रकारिता पदविका, जर्मन भाषा पदविका त्यांनी मिळविली आहे. मार्केटिंग व मार्केट रिसर्च अ‍ॅनेलिस्ट म्हणून विविध कंपन्यांसाठी काम केले आहे. भाजपाच्या नगरसेविका म्हणून त्या २००२मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर २००७, २०१२ व २०१७ अशा सलग ४ वेळा त्या पालिकेवर निवडून आल्या आहेत. सध्या भाजपाच्या शहर उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. लोकमान्य टिळक विचार मंच, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेच्या उपाध्यक्ष, प्रेरणा महिला मंडळाच्या संस्थापक, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाच्या उपाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीला दोन अपक्षांचा पाठिंबा : राष्ट्रवादी काँग्रेसला रामटेकडी-सय्यदनगर या प्रभाग क्रमांक २४ मधून निवडून आलेले अशोक धाकू कांबळे व रुकसाना इनामदार या दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.पक्षीय बलाबलभाजपा९३ (एका अपक्षाच्या पाठिंब्यासह)राष्ट्रवादी काँग्रेस४१ (२ अपक्षांचा पाठिंब्यासह)शिवसेना१० काँग्रेस१० (एका अपक्षाच्या पाठिंब्यासह)रिपाइं०५मनसे०२एमआयएम०१एकूण१६२- महापालिका निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदांसाठी बुधवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले.