शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपाच्या वर्धापनदिन निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 9:15 PM

येत्या ६ एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआमदार , खासदारही वगळलेआमदार व नगरसेवक यांच्याच जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद

पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे या पत्रिकेत नाहीत. विशेष म्हणजे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचेच आमदार आहेत. तरीही त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत. येत्या ६ एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्याच जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या १०१ नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक, खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरून पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. मुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात ८ एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा मेळावा होईल.त्यावेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकाºयांची नावे वगळण्यात आली आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. पक्षासाठी ही गौरवाची बाब आहे, किमान त्यांचे नाव तरी टाकायला हवे होते असे काही कार्यकर्त्यांचे मत आहे.  ...................पक्षाचे काही शिष्टाचार आहेत, ते माहिती नसलेल्यांकडून ही टीका होत आहे. हा पक्षसंघटनेचा कार्यक्रम आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांचे नाव पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात येणे योग्य नाही. केंद्रीय मंत्री, पालकमंत्री व शहराध्यक्ष यांची नावे असणे पक्षाच्या नियमाला धरून आहे.योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजपा   

  

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाanil shiroleअनिल शिरोळेMukta Tilakमुक्ता टिळकDilip Kambleदिलीप कांबळे