पुणे: केंद्र शासनाने उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रमाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शासनाने केवळ शासकीय संस्थांमधील अभ्यासक्रम बंद करण्याचे जाहीर केले. मात्र, त्याचा परिणाम अनुदानित व विना अनिदानित संस्थांच्या प्रवेशावर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पुणे विभागातील २१० आणि पुणे जिल्ह्यातील ८५ संस्थांना त्याचा फटका बसू शकतो.
पुणे विभागाच्या व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण कायालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये इयत्ता अकरावीत विविध संस्थांमध्ये १५हजार १७७ विद्यार्थी उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रमास (एमसीव्हीसी)प्रवेश घेतात. मात्र ,राज्य शासनाने शासकीय संस्थांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम बंद करून त्यांचे आयटीआयमध्ये विलिनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, एकीकडे व्यावसाय अभ्यासक्रमाचा आग्रह धरला जात असताना एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीपासूनच व्यावसाय अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन स्वत:चा व्यावसाय सुरू करावा किंवा रोजगार करावा, या उद्देशाने केंद्र शासनाने एमसीव्हीसी अभ्यासक्रम सुरू केले. मात्र, या अभ्यासक्रमासाठी केंद्राने केवळ वेतन अनुदान दिले. पायाभूत सुविधा किंवा मशनरी घरेदीसाठी निधी दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाने या अभ्यासक्रमांचे समायोजन आयटीआयमध्ये करण्याचा निर्णय घेतला. २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील आकडेवारीनुसार विभागातील ५४० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अद्याप अनुदानित व विना अनुदानित संस्थांमधील एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद झालेला नाही, असेही व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालायातील अधिका-यांनी सांगितले.
-------------------------------------
जिल्ह्याची २०१९-२०२० शैक्षणिक वर्षातील आकडेवारी
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रम शासकीय संस्था : १
एकूण प्रवेश क्षमता ९,४००
अनुदानित संस्था : ८५, संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५०७२
विना अनुदानित संस्था : ११ संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ६६०
----------------------------------------------
एमसीव्हीसीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक ज्ञान मिळते.काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही.एमसीव्हीसीच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टींची माहिती अकरावी-बारावीतच मिळते. तसेच त्याचा व्यावहारात उपयोग करता होेतो.त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम पाचवीपासून असणे गरजेचे आहे.
- प्रदीप मोहित, माजी विद्यार्थी,एमसीव्हीसी
----------------------------------
एमसीव्हीसीमुळे प्रात्यक्षिक ज्ञान मिळते. त्यामुळे तात्काळ व्यावसाय करता येतात.तसेच पुढील शिक्षणही घेता येते.अकरावी-बारावी ऐवजी शालेय शिक्षणापासून एमसीव्हीचा अंतर्भाव करावा.
नितीन वाबळे, माजी विद्यार्थी ,एमसीव्हीसी
-----------------------------------
एमसीव्हीसी बंद केल्याने शिक्षकांच्या रोजगावर व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणाम होणार नाही,याबाबत शासनाने आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. एमसीव्हीसी बंद निर्णामुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होऊ नये.
- प्रा.नंदकुमार निकम, सह सचिव, सी.टी.बोरा.महाविद्यालय,